पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग। गोखले, अशोक भालचंद्र प्रशासन खंड (जनुकीयदृष्ट्या सुधारित कापसाची जात) मान्यता दिली. जानेवारी २००३ ते ऑगस्ट २००३ या दरम्यान ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष होते. २००३ सप्टेंबर ते २००६ जानेवारी या कालावधीत ते (न्यू अ‍ॅण्ड रिन्युएबल एनर्जी मिनिस्ट्री) नवीन आणि नवीनतम ऊर्जा केंद्र सरकारचे सचिव होते. याच पदावरून गोखले निवृत्त झाले. या कार्यकालात त्यांनी ग्रामीण ऊर्जा सुरक्षा कार्यक्रमांतर्गत ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. यामार्फत त्यांनी ग्रामीण भागातील ऊर्जा सुरक्षेसाठी कार्यक्रमाचा आराखडा तयार केला आहे. ३१जानेवारी२००६ रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी दीड वर्षे एम.एस. स्वामिनाथन संशोधन केंद्र, चेन्नई येथे कार्यकारी संचालक या पदावर काम केले. अच्युत गोखले यांना वनस्पतींची छायाचित्रे काढण्याचा आणि त्यांचा संग्रह करण्याचा छंद आहे, तसेच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकणे हादेखील त्यांचा छंद आहे. - संध्या लिमये

गोखले, अशोक भालचंद्र भारतीय परराष्ट्र सेवा, सचिव परराष्ट्र मंत्रालय २८ ऑक्टोबर १९३० अशोक भालचंद्र गोखले यांचा जन्म बिहार (आत्ताचे झारखंड) राज्यातील रांची येथे झाला. त्यांचे वडील आय.सी.एस. होते. त्यांनी १९१५ ते १९५२ या कालावधीत ब्रिटिशकालीन बिहार आणि ओरिसा या प्रांतात प्रांताधिकारी म्हणून काम केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ते केंद्र सरकारच्या खाणकाम आणि ऊर्जा मंत्रालयाचे सचिव होते. त्यानंतर त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान राजेंद्र प्रसाद यांचे सचिव म्हणून काम केले तर १९५३ ते ५४ या कालावधीत ते भारताचे नेपाळमधील राजदूत होते. अशोक गोखले यांच्या आईचे नाव मनोरमा असे होते. गोखले यांचे माध्यमिक शिक्षण सेंट झेवियर हायस्कूल पटना आणि उत्तराखंड मधील डून स्कूलमध्ये झाले. १९५१ मध्ये त्यांनी पुणे येथील फर्गसन महाविद्यालयामधून गणित या विषयात बी.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी गोखले इंग्लंडमधील फिट्झविल्यम हाऊस केंब्रिजमध्ये दाखल झाले. १९५२-५३ मध्ये अशोक गोखले यांनी इम्पिरिअल बँक ऑफ इंडियामध्ये हैदराबाद येथे सहायक अधिकारी या पदावर काम केले. १९५५ मध्ये गोखले केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये निवड झाली. दिल्लीमधील मेटकॉफ हाऊसमधील प्रशिक्षणानंतर त्यांची प्रथम नियुक्ती ऑस्ट्रिया देशाची राजधानी व्हिएन्ना येथे दूतावासाचे तृतीय सचिव (थर्ड सेक्रेटरी टू एम्बसी) या पदावर करण्यात आली. १९५८ ते १९६२ या काळात गोखले यांनी पश्‍चिम जर्मनीमधील बर्न येथे अर्थ आणि वाणिज्य या विषयाचे प्रथम सचिव या पदावर काम केले. या कालावधीत आपल्या देशात दुसर्‍या पंचवार्षिक योजने अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रात उद्योगांची उभारणी करण्यात आली. त्यासाठी आपल्या देशाला परकीय गुंतवणुकीची आवश्यकता होती. त्यावेळी गोखले यांनी दाखवलेल्या राजनैतिक कौशल्यामुळेच, ओरिसामध्ये रुरकेला येथे उभारण्यात येणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील पहिल्या लोह-पोलाद कारखान्यासाठी पश्‍चिम जर्मनीकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळू शकली. १९६२ ते ६५ या काळात गोखले यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या पश्‍चिम युरोप विभागाचे उपसचिव या पदावर काम केले. १९६५मध्ये भारत सरकारने जॉर्डनमध्ये भारतीय दूतावास सुरू करण्याचे ठरवले. या दूतावासाच्या २१६ शिल्पकार चरित्रकोश