पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ग प्रशासन खंड गोखले, अशोक भालचंद्र उभारणीची संपूर्ण जबाबदारी अशोक गोखले यांच्याकडे देण्यात आली. तेथे त्यांची ‘अ‍ॅम्बॅसेडर सी.डी.ए.’ या पदावर जून १९६७ मध्ये नेमणूक झाली. नंतर अरब-इस्राईल यांच्यामध्ये ६ दिवसांचे युद्ध झाले. जॉर्डन हा अरब देश आहे. या युद्धात भारताचा इस्राईलला पाठिंबा होता. यामुळे भारताची भूमिका जॉर्डनला समजावून देण्याची खूप मोठी जबाबदारी गोखले यांनी पार पाडली. १९६८ ते ७१ या काळात फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये गोखले यांची नियुक्ती काउन्सिलर या पदावर करण्यात आली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये फ्रान्सकडून पाकिस्तानला जो शस्त्रास्त्र पुरवठा करण्यात येत होता तो थांबवण्यासाठी गोखले यांनी भारतीय दूतावासामार्फत खूप प्रयत्न केले. नंतर गोखले यांची भूतानमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. या छोट्याशा देशाला विविध क्षेत्रांतील विकास कामासाठी भारतातर्फे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी गोखले यांच्यावर होती. चुखा हा नेपाळचा पहिला जलविद्युत प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. १९७४ ते ७७ या कालावधीत गोखले परराष्ट्र मंत्रालयाचे सहसचिव या पदावर कार्यरत होते. यावेळी त्यांच्यावर पश्‍चिम युरोप आणि संसद विभाग या पदांची जबाबदारी होती. संपूर्ण परराष्ट्र व्यवहारांचा समन्वय ठेवण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी यावेळी अशोक गोखले यांनी पार पाडली. १९७४ मध्ये पोखरण येथे भारताने पहिली अणुचाचणी घेतली. त्यामुळे संपूर्ण जगभर विशेषत: युरोपीय देशांमध्ये भारताविरुद्ध प्रतिकूल वातावरण निर्माण झाले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या पश्‍चिम युरोप विभागाचे सचिव म्हणून युरोपियन देशांना भारताची भूमिका समजावून देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी गोखले यांनी पूर्ण केली. गोखले यांच्या कारकिर्दीत ‘इंडो-पोर्तुगीज ट्रिटि ऑफ रिझम्शन ऑफ डिप्लोमॅटिक रिलेशन’ हा महत्त्वपूर्ण परराष्ट्र करार झाला. स्वातंत्र्यपूर्व भारतातील गोवा या राज्यावर पोर्तुगिजांचा अंमल होता. १९६१ मध्ये लष्करी कारवाई करून गोवा मुक्त करण्यात आला. त्यानंतर पोर्तुगालने नाराज होऊन भारतासोबतचे सर्व राजनैतिक संबंध तोडले होते. पण ३१ डिसेंबर १९७४ रोजी झालेल्या या कराराने पोर्तुगालने गोव्यावरील आपला हक्क जाहीरपणे सोडून दिला. पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मारिओ यांनी भारताला भेट देऊन भारतासोबतचे राजनैतिक संबंध पुन्हा सुरू केले. १९७५ मध्ये आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली. लोकशाहीचे पुरस्कर्ते असणार्‍या युरोपीय देशांमध्ये भारताविरुद्ध प्रतिकूल वातावरण निर्माण झाले. गोखले यांना यावेळी आपले राजनैतिक कौशल्य पणाला लावावे लागले. युरोपियन देशांसोबत परराष्ट्र व्यवहार सांभाळत असताना त्यांनी आणीबाणी विरुद्ध त्या देशांमध्ये निर्माण झालेली प्रतिकूल भूमिका सांभाळण्याचा प्रयत्न केला. मार्च १९७७ मध्ये जनता सरकारच्या राज्यात अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री होते. त्यावेळी अशोक गोखले यांची नियुक्ती वॉशिंग्टनमध्ये अतिरिक्त सचिव म्हणून करण्यात आली. यावेळी अमेरिकेत राजदूत असलेल्या नानी पालखीवाला यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच पद सोडले. त्यानंतर १३ महिने गोखले यांनी आपल्या पदावर काम करून राजदूताच्याही सर्व जबाबदार्‍या पार पाडल्या. याच कालावधीत भारताने केलेली अणुचाचणी, आणीबाणी या कारणांमुळे अमेरिकेने भारताला अणुऊर्जा निर्मितीसाठी लागणारे समृद्ध युरेनियम खनिज देण्याचे नाकारले. परंतु गोखले यांच्या प्रयत्नांमुळे युरेनियमचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला. १९८० ते ८७ या काळात गोखले इराण, इस्लामिक प्रजासत्ताकामध्ये राजदूत या पदावर कार्यरत होते. १९८० ते ८९ या ९ वर्षांच्या कालावधीत इराण आणि इराक यांच्यामध्ये युद्ध झाले. यावेळी भारताकडे अलिप्त राष्ट्र चळवळीचे अध्यक्षपद होते. शिल्पकार चरित्रकोश २१७