पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड गोखले, अच्युत माधव आहे. त्यांना राज्यपालांच्या हस्ते ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यात आला. त्याचप्रमाणे सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अ‍ॅण्ड पॉवरचा ‘आयपी सिन्हा पुरस्कार’, पुणे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचा ‘रावबहादूर पुरस्कार’, तसेच प्रेरणा फाउण्डेशनचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत शासनाने त्यांच्यावर अनेकदा महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविल्या होत्या. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेचे ते अध्यक्ष होते. आर्बिट्रेटर इंडियन काउन्सिलचे सदस्य, भारतीय जलसंपदा संस्था, कोलकाता या संस्थेचे सदस्य अशा विविध शासकीय संस्थांवर त्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली आहे. ३१ ऑक्टोबर २००९ रोजी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा खात्याच्या सचिव पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीनंतरही ते शासनाच्या जलसंपत्ती नियमन प्राधिकरणावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. - विजयकुमार मोरे

गोखले अच्युत माधव सचिव, शिक्षण, ग्रामीण विकास, (नागालँड) केंद्रीय सचिव, वन-पर्यावरण व ऊर्जा खाते ३ जानेवारी १९४६ अच्युत माधव गोखले यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा या लहानशा गावात झाला. त्यांच्या आईचे नाव सुशीला होते. त्यांचे वडील माधव श्रीपाद गोखले हे जुन्या सोशालिस्ट पार्टीमध्ये कार्यरत होते. जयप्रकाश नारायण, एस.एम.जोशी, ना.ग.गोरे, मधूलिमये या महत्त्वाच्या समाजवादी नेत्यांबरोबर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात काम केले होते. १९७५ च्या जनता सरकारच्या नेत्यांबरोबर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात काम केले होते. १९७५ च्या जनता सरकारच्या स्थापनेतही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. खादी ग्रामोद्योग आयोगातून ते संचालक या पदावरून निवृत्त झाले. अच्युत गोखले यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या चेंबूर विद्यालयामध्ये झाले. या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम आयोजित केले जात. याचा गोखले यांच्या सर्वांगीण विकासासाठी फायदा झाला. मुंबई येथील एलफिन्स्टन महाविद्यालयातून आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसमधून त्यांनी गणित आणि भौतिकशास्त्र या विषयांत बी.एस्सी. पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी व्ही.जे.टी.आय.मधून अभियांत्रिकीचे एक वर्ष पूर्ण केले. परंतु पूर्ण होण्याअगोदरच १९६६ मध्ये ते शॉर्ट सर्व्हिस कमिशनची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय नौदलात लेफ्टनंट या पदावर दाखल झाले. भारतीय नौदलातील एकूण सात वर्षांच्या कारकिर्दीत साडेतीन वर्षे त्यांनी मिसाइल बोट्स स्क्वॉड्नमध्ये काम केले. त्या वेळी भारताने रशियाकडून मिसाइल बोट्स विकत घेतल्या होत्या. त्यासाठीचे विशेष प्रशिक्षण घेण्यासाठी अच्युतराव गोखले १९६९ ते ७० हे एक वर्ष रशियामध्ये गेले होेते. रशियाकडून घेण्यात आलेल्या बोटींपैकी आर.एन.एस. विनाश या बोटीने १९७१ च्या पाकिस्तानच्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आर.एन.एस. विनाश या बोटीवर अच्युत गोखले कार्यरत होते. या बोटीने सौराष्ट्राजवळ पाकिस्तानच्या दोन बोटी बुडवल्या. एवढेच नव्हे, तर थेट कराचीपर्यंत जाऊन पाकिस्तानच्या तीन बोटींना जलसमाधी दिली. या ठिकाणी असणारा तेलाचा प्रचंड साठा उद्ध्वस्त केला. या युद्धात गाजवलेल्या पराक्रमाबद्दल गोखले यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. १९६२ च्या भारत-चीन युद्धामध्ये मोठ्या संख्येने भारतीय युवक सैन्यात दाखल झाले होते. या शिल्पकार चरित्रकोश २१३