पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग। गायकवाड, व्यंकट विश्वनाथ प्रशासन खंड गायकवाड, व्यंकट विश्वनाथ मुख्य सचिव, जलसंपदा विभाग २९ ऑक्टोबर १९५१ व्यंकटराव विश्वनाथराव गायकवाड यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथे झाला. त्यांचे वडील विश्वनाथराव गायकवाड हे स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे मूळ गाव उमरगा तालुक्यातील आष्टा जहांगीर हे होय. विश्वनाथराव गायकवाड यांनी वकिलीचे शिक्षण घेतलेले असले तरी त्यांचा ओढा शिक्षण क्षेत्राकडे होता. मराठवाड्यात एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून गणल्या गेलेल्या उमरगा येथील भारत शिक्षण संस्थेच्या स्थापनेत त्यांचा प्रमुख सहभाग होता. घरी शेतीवाडी भरपूर असली तरी त्यात त्यांचे मन रमत नव्हते. त्यामुळेच ते पत्नी झिंगुबाईसह आष्टा जहांगीर या खेड्यातून पुणे-हैदराबाद महामार्गावर असणार्‍या उमरगा या तालुक्याच्या गावी वास्तव्यास आले. त्या वेळी एकत्र कुटुंबपद्धती होती. व्यंकटराव गायकवाड यांच्यासोबत त्यांची भावंडे, चुलत भावंडे असा मोठा परिवार होता. घरात शिक्षणाचे वातावरण होते. वडील स्वत:च भारत शिक्षण संस्थेत होते. आजूबाजूच्या परिसरातील नातेवाइकांची मुले शिक्षणासाठी ते आपल्या घरी आणून ठेवत आणि त्यांचा राहण्या-जेवण्याचा खर्च करीत. व्यंकटरावांच्या शिक्षणाचा ओनामा एका खाजगी शाळेतून झाला. मालतीबाई नावाच्या एक ब्राह्मण महिला ती खाजगी शाळा चालवत. त्या शाळेतून त्यांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. पुढे तिसरीला त्यांनी भारत विद्यालयात प्रवेश घेतला. व्यंकट गायकवाड लहानपणापासून हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते. चौथीच्या बोर्डाच्या परीक्षेत तालुक्यात त्यांनी पहिला क्रमांक पटकावला. तो यशाचा आलेख कायम ठेवत त्यांनी १९६६मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी भारत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या वेळी मॅट्रिकनंतर पीयूसीचा बारावी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी.एस्सी. प्रथम वर्षाला प्रवेश मिळायचा. त्यानंतर मग पुढे वैद्यक किंवा अभियांत्रिकीला जाता येत असे. सत्तरच्या दशकात मराठवाड्यात अनेक धरणांची कामे चालू होती. या धरणांची कामे करणारे मराठवाड्याचेच मारुतीराव शिंदे हे पाटबंधारे खात्यात अधीक्षक अभियंता होते. त्यांचे गावही उमरगा तालुक्यातच होते आणि ते व्यंकट गायकवाडांचे मामा होते. मारुतीराव शिंदे ते जेव्हा गावी येत, तेव्हा त्यांच्यासोबत प्रचंड मोठा फौजफाटा असे. सरकारी गाडी, नोकर-चाकर आणि त्यांना मिळणारा सन्मान हे बघून व्यंकटरावांच्या मनात त्या वेळी पहिल्यांदा महत्त्वाकांक्षा चमकून गेली की, आपणही शिंदे साहेबांसारखे इंजिनिअर व्हावे. त्यात व्यंकटरावांचा गणित विषय आवडीचा आणि पक्का होता. अनेकदा त्यांना शंभरपैकी शंभर गुण मिळत त्यामुळे त्यांनी पुढे अभियांत्रिकीला जाण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाविद्यालयात बी.एस्सी. प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून स्थापत्य अभियांत्रिकीला प्रवेश घेतला आणि १९७२मध्ये बी.ई. होऊन ते बाहेर पडले. पुढे एम.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण होऊन मारुतीराव शिंदे यांच्यासारखे मोठे अधिकारी व्हावे असे त्यांचे स्वप्न होते. परंतु त्या वेळी एम.पी.एस.सी. परीक्षेला बसण्यासाठी एकवीस ते सव्वीस वर्षांची अट होती. त्या निकषात न बसल्यामुळे त्यांना ताबडतोब ती परीक्षा देता आली नाही. व्यंकटरावांचे मामा मारुतीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ते पाटबंधारे खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून १६जून१९७२ रोजी जायकवाडी प्रकल्प शिल्पकार चरित्रकोश