पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ख खैरनार, गोविंद राघो प्रशासन खंड हित, समाजाचे हित डोळ्यापुढे ठेवून त्याला विरोध केला. प्रसंगी शासकीय सेवेवर पाणी सोडण्याची तयारी देखील त्यांनी दाखविली होती. - डॉ. दि. मा. मोरे संदर्भ : १. कुलकर्णी, भुजंगराव; ‘मी, मराठवाडा आणि महाराष्ट्र’.

खैरनार, गोविंद राघो उपायुक्त - बृहन्मुंबई महानगरपालिका १४ एप्रिल १९४२ बृहन्मुंबईमहानगरपालिकेतील अतिक्रमणविरोधी कारवाया करिता व देशव्यापी चर्चेसाठी सर्वाधिक गाजलेली कारकीर्द म्हणून गोविंद राघो खैरनार यांची कारकीर्द ओळखली जाते. लहानपणापासून प्रत्येक बाबतीत केवळ सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास न ठेवता ती गोष्ट स्वानुभवाने तावून सुलाखून घेणे व मगच योग्य व खर्‍या निष्कर्षाप्रत पोहोचणे ही खैरनार यांची सवय, तसेच अन्यायाविरुद्ध आपला आवाज उठवणे व विरोध करणे ही त्यांची वृत्ती या गोष्टी प्रेरणादायक आहेत. एका शेतकरी कुटुंबात नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातल्या पिंपळगाव (वाखारी) येथे गोविंद राघो खैरनार यांचा जन्म झाला. पूर्णपणे अशिक्षित अशा घराण्यातील गोविंद खैरनार हे शाळेत जाणारे पहिलेच. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाशिक येथील भिकुसा यमासा क्षत्रिय वाणिज्य महाविद्यालयातून त्यांनी बी.कॉम. पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षणासोबत त्यांनी एन.सी.सी. मध्येही प्रवेश घेतला व उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पारितोषिकही मिळविले. शालेय, महाविद्यालयीन जीवनातही अपात्र शिक्षक व भ्रष्टाचारी वसतिगृह चालक यांच्याविरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला आहे. प्रथमत: १९६४ पासून राज्यशासनाच्या सेवेत त्यांनी नोकरीची सुरुवात केली व नंतर १९७४ पासून बृहन्मुंबई महापालिकेच्या सेवेत ते विभाग अधिकारी म्हणून रुजू झाले. अनधिकृत बांधकामविरोधी कारवायांमुळे खैरनार यांची कारकीर्द विशेष गाजली. मुंबईतील फोर्ट वस्तुसंग्रहालयाजवळील अनधिकृत दुकाने व फेरीवाले हटविण्याची मोहीम ही अशा प्रकारच्या मोहिमांची सुरुवात होती. प्रचंड राजकीय विरोध, वरिष्ठांचा विरोध अशा एकूणच दबावपूर्ण स्थितीतही आपण आपले काम चोखपणे बजावण्याची हातोटी व प्रसंगी आवश्यक असा निर्भयपणा व कर्तव्य, कार्यतत्परता या गुणांमुळेच खैरनार भविष्यकाळात ‘वन मॅन डिमॉलिशन आर्मी’ या विशेषणाने ओळखले जाऊ लागले. कुर्ला विभागातील कुर्ला स्टेशनच्या पश्चिमेला लागून असलेल्या बस टर्मिनसच्या ठिकाणी दोनशे-अडीचशे फेरीवाले, पथारीवाले, हातगाडीवाले, टपर्‍या इत्यादींनी अतिक्रमण केल्याने बससेवा बंद करण्याची वेळ आली होती. पोलिसांच्या मदतीने प्रथम अतिक्रमण हटविण्याच्या प्रयत्नात अपयश आले. सोबत आवश्यकतेपेक्षा जास्त पोलीस ताफा असूनही केवळ राजकीय इच्छाशक्तीवरच देशातील यंत्रणा २०४ शिल्पकार चरित्रकोश