पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क कोल्हटकर, मधुसूदन रामचंद्र प्रशासन खंड मुंबई या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जुलै २००५ ते जुलै २००७ पर्यंत काम पाहिले. २०१० च्या या संस्थेच्या अहवालात कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे भाषण छापले आहे. ‘राइज अ‍ॅण्ड फॉल ऑफ टीचिंग, लर्निंग ऑफ संस्कृत लंग्वेज इन द पीरियड ऑफ १५०० टू २०००’ हा विषय डॉ. मधुसूदन कोल्हटकर यांनी भाषणात मांडला. अलीकडच्या काळात, नोव्हेंबर २००९ मध्ये नवी दिल्ली येथील ‘वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन फेडरॅलिझम’ या भारत सरकारच्या गृहखात्याने आयोजिलेल्या परिषदेत डॉ. कोल्हटकर उपस्थित होते. तसेच मार्च २००९ मध्ये डॉ. वि.म. दांडेकर यांनी पुणे येथे स्थापन केलेल्या ‘इंडियन स्कूल ऑफ पोलिटिकल अ‍ॅकॅडमी’ या संस्थेत अ क्रिटिकल अ‍ॅण्ड कॉम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हे ऑफ हायर एज्युकेशन इन पोस्ट-इंडिपेंडन्स इंडिया’ हे प्रकल्प त्यांनी पूर्ण केले. गेल्या पन्नास वर्षांत अशा अनेक प्रकल्पांची कामे सतत करण्याचे सामर्थ्य डॉ. कोल्हटकरांकडे आजही आहे. शिक्षण क्षेत्राची बांधीलकी त्यांनी केली आहे, त्याबरोबर इतर क्षेत्रांना नाकारले नाही. ज्याचा खास उल्लेख करावासा वाटतो ते एमएसएफसी या महामंडळाने दिलेल्या एप्रिल १९७९ च्या मानपत्रात म्हटले आहे, “डॉ. कोल्हटकर साहेब, आपण आपल्या छोट्या कारकिर्दीत महामंडळाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी रात्रंदिवस झटलात, परिणामी महामंडळाच्या कामात गती व नीटसपणा तर आलाच; पण त्याचबरोबर महामंडळाच्या कार्याची व्याप्तीही अधिक सखोल व विस्तारित झाली,” हे कौतुकास्पदच होय. शासनाच्या विविध विभागांत काम करताना महाराष्ट्राचे अनेक यूजीसी, एनसीईआरटी मुख्यमंत्री, मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांच्याशी त्यांचा संपर्क आला. नियोजन मंडळ इत्यादी संस्थांमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या संधीचे त्यांनी देशहितासाठी सोने केले. जुलै-डिसेंबर २०१० च्या ‘समाजप्रबोधन पत्रिके’त डॉ. कोल्हटकरांचा ‘यशपाल समितीचा अहवाल - एक गमावलेली संधी’ हा लेख प्रसिद्ध झाला. त्याचा उल्लेख करून कै. डॉ.चित्रा नाईक (शिक्षणतज्ज्ञ) यांनी २४ ऑगस्ट २०१० रोजी डॉ. कोल्हटकरांना पत्र देऊन सन्मानच केला आहे. प्रशासनाच्या माध्यमातून देशसेवा करून देशविदेशात त्यांनी कराड नगरीची कीर्ती विश्वपातळीवर पोहोचविली, या कार्याच्या गौरवार्थ १९९८ मध्ये ‘कराडभूषण’ हा पुरस्कार ‘आदरणीय पी.डी.पाटील गौरव प्रतिष्ठान कराड’ यांनी देऊन त्यांचा गौरव केला. - डॉ. मधुकर नानकर

२०२ शिल्पकार चरित्रकोश