पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क प्रशासन खंड कोल्हटकर, मधुसूदन रामचंद्र करणार्‍या या मुंबईच्या शेवटच्या ब्रिटिश पोलीस आयुक्ताचे हे वर्तन प्रेरणादायक म्हटले पाहिजे. - संपादित

कोल्हटकर, मधुसूदन रामचंद्र सचिव - शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य २९ मार्च १९३६ मधुसूदन रामचंद्र कोल्हटकर यांचा जन्म कराड येथे झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कराड येथेच झाले. १९५३ मध्ये एस.एस.सी.च्या परीक्षेत चार विषयांत त्यांनी प्रथमपदाचे पारितोषिक पटकावले. मराठीचे राम गणेश गडकरी, तर संस्कृतची जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी घेतली. सामाजिक शास्त्र विषय घेऊन ते १९५९ मध्ये एम.ए.ला पुणे विद्यापीठात पहिले आले. ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्याच वेळी देत होते. १९५९-६० या वर्षात ते या आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. दि.१६ मे १९६० पासून आय.ए.एस. अधिकारी म्हणून त्यांनी शासकीय सेवेस प्रारंभ केला. शासकीय सेवेत काम सुरू केल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनातील अर्थ, नियोजन, शेती, अन्न, सामान्य प्रशासन अशा महत्त्वाच्या खात्यांबरोबरच त्यांच्या आवडत्या शिक्षणखात्यातही काम केले. उपसचिव, सहसचिव, तसेच सचिव पदाची जबाबदारी त्यांनी प्रामाणिकपणे, अभ्यासपूर्ण रितीने पार पाडली. त्यामुळेच केंद्र शासनाने सोपविलेली अत्यंत महत्त्वाची कामेही त्यांच्याकडे चालून आली. ३३ वर्षे (१९६० ते १९९३) शासकीय कामे करून त्यांनी कार्याचा आनंद मिळविला. १९८५ ते १९८७ या कालखंडात शिक्षण सचिव म्हणून कार्य करताना त्यांच्यातील विद्यार्थी जागृत होता. त्यांनी शासकीय विधी महाविद्यालय मुंबईमधून एलएल.बी.ची पदवी प्राप्त केली. सेवानिवृत्तीनंतर म्हणजे १९९३ ते १९९८ या काळात त्यांनी ‘सेंट्रल अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्यूनल’चे अहमदाबाद व मुंबई बेंचचे सदस्य म्हणून साडेचार वर्षे काम केले.

सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे वाचन, लेखन, मनन, चिंतन  चालू असते. वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी, ऑगस्ट २००७ मध्ये  त्यांनी  मुंबई विद्यापीठातून फेडरेशन इन अ‍ॅक्शन-द केस ऑफ एज्युकेशन सेक्टर या विषयात पी.एच.डी.ची पदवी मिळविली. कोल्हटकर यांनी काही पुस्तकांचे लेखनही केले आहे.  ‘एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅण्ड नॅशनल डेव्हलपमेंट’, तसेच ‘पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन इनोव्हेशन’ या दोन पुस्तकांचे ते लेखक आहेत. 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांनी अकरा संशोधनपर लेख लिहिले आहेत. समीक्षक म्हणून अनेक नियतकालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे. शैक्षणिक तज्ज्ञ परीक्षक म्हणून महत्त्वाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. डॉ.कोल्हटकर यांना प्रशासकीय कामानिमित्त आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणाच्या निमित्ताने इटलीत २४ आठवड्यांचे परदेशगमन करावे लागले. तसेच वॉशिंग्टन येथे अकरा आठवड्यांसाठी जावे लागले. थायलंड, मनिला, सिंगापूर, काठमांडू, सार्क परिषदेच्या निमित्ताने ढाका, इस्लामाबाद येथे जाऊन त्यांनी भारताची बाजू समर्थपणे मांडण्याचे कार्य केले. डॉ. कोल्हटकर यांनी अनेक अभ्यासवर्ग परिषदा, परिसंवाद यांत भाग घेतला आहे. आयआयएम, बंगलोर टाटा मॅनेजमेंट सेंटर, पुणे, एनआयबीएम, पुणे, आयआयएम, कोलकाता, इंडियन सोसायटी ऑफ सीए, न्यू दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एंटरप्राइझेस, हैद्राबाद या नामवंत संस्थांच्या प्रशिक्षणवर्गात प्रशिक्षक म्हणून त्यांनी उत्तम काम केले. एशियाटिक सोसायटी ऑफ शिल्पकार चरित्रकोश २०१