पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क कॅफिन ए. ई. प्रशासन खंड नेमणूक झाली. यानंतर मुंबईतही त्यांची बदली झाली. पुण्यातील बदलीत त्यांनी सेल्स टॅक्स विभागात साहाय्यक आणि उप आयुक्त (असिस्टंट अ‍ॅण्ड डेप्युटी कमिशनर सेल्स टॅक्स) या पदावर काम केले. १९६४ मध्ये यशवंतराव चव्हाण केंद्र सरकारात संरक्षण मंत्री असताना त्यांनी केळकर यांची विशेष सचिव म्हणून नियुक्ती केली. पुढे १९७२ पर्यंत त्यांनी सचिव पदावर काम केले. यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी, सिकॉमचे व्यवस्थापकीय संचालक, केंद्र सरकारात पेट्रोलियम व रसायन विभागाचे सहसचिव तसेच राज्याचे उद्योग आयुक्त या पदावरही त्यांनी काम केले. महाराष्ट्र उद्योजकता प्रशिक्षण व विकास केंद्र (औरंगाबाद), उद्योगमित्र या संस्था आणि संघटनांच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. केंद्र सरकारच्या बँकिंग विभागाचे अतिरिक्त सचिव पदावरचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांना ‘एशियन डेव्हलपमेंट बँके’च्या कार्यकारी संचालक पदासाठी मनिला येथे त्यांची निवड झाली. ७ मे १९८८ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. - प्रभाकर करंदीकर

कॅफिन, ए.ई. शेवटचे ब्रिटिश पोलीस आयुक्त - मुंबई जन्म-मृत्यू दिनांक अनुपलब्ध ए.ई.कॅफिन हे मुंबई इलाख्याचे शेवटचे ब्रिटिश पोलिस आयुक्त होते. १९४७ साली भारत स्वतंत्र होण्याच्या फक्त सहा महिन्यांपूर्वी ते मुंबईचे पोलिस आयुक्त झाले. स्त्रियांना पोलीस दलात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनीच प्रथम आपल्या कार्यकालात कायदा केला. त्यांनी १ ऑगस्ट १९४७ या दिवशी एका महिलेची पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती केली. त्यानंतर दोन आठवड्यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी आपला पदभार जे.एस.भरुचा यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपवला. पोलीस निरीक्षक जे.एस.भरुचा हे त्यांचे नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील सहाध्यायी होते. मुंबईचे माजी डी.सी.सी. व्ही.जी.कानेटकर यांनी कॅफिन यांचे जे वर्णन केले आहे त्यातून त्यांची पोलीस अधिकारी म्हणून बजावलेली कामगिरी अधोरेखित होते. व्ही.जी. कानिटकर लिहितात, “१४ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांनी आपला पदभार जे.एस.भरुचा यांच्याकडे सन्मानपूर्वक सोपविला. या प्रसंगाची नोंद ठेवणे ही मी माझी जबाबदारी समजतो. ब्रिटिश शासनाने दिलेली मुदतपूर्व निवृत्ती स्वीकारण्याची सवलत कॅफिन यांच्या सोबतच्या अनेक ब्रिटिश अधिकार्‍यांनी स्वीकारली. परंतु कॅफिन यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी निष्ठापूर्वक पूर्ण केली. शिल्लक राहिलेले प्रत्येक काम पूर्ण केले. त्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या आणि त्यानंतरच त्यांनी आपला पदभार भरुचा यांच्याकडे समारंभपूर्वक सुपूर्त केला. आपल्या लौकिकाला शोभेल अशा पद्धतीने निवृत्ती स्वीकारली.” परक्या देशावरील आपले शासन समाप्त होण्याच्या काळातही अत्यंत काळजीपूर्वक कर्तव्यनिष्ठेने काम शिल्पकार चरित्रकोश २००