पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड केळकर, शरद मनोहर विभागाचे अध्यक्षपद तसेच भारत सरकारच्या अर्थसचिव पदावरून कार्य करण्याची संधी लाभली. केळकर तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले. भारतात आर्थिक सुधारणा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर लगेच त्यांना ‘युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलमेंट’ या जिनिव्हास्थित आंतरराष्ट्रीय संस्थेच्या व्यापार विभागात संचालक व समन्वयक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. १९९४ पर्यंत त्यांनी या पदावर उत्कृष्ट कार्य केले. त्यानंतर १९९४मध्ये भारतात येऊन त्यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू खात्यातील सचिवपद स्वीकारले. तीन वर्षे हे पद सांभाळल्यानंतर पुढे त्यांनी विविध खात्यांत अध्यक्षपदावरूनच काम केले. त्यामध्ये केंद्रीय जकात (टॅरिफ) आयोग, औद्योगिक विकास वित्त महामंडळ (आयडीएफसी, प्रायव्हेट इक्विटी, मुंबई), वित्त आयोग, भारतीय विकास प्रतिष्ठान, राष्ट्रीय शेअर बाजार या सर्व संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. मधल्या काही वर्षात त्यांनी भारत सरकारचे अर्थ सचिव (१९९८-९९) म्हणून तसेच जागतिक नाणेनिधीच्या भारत, श्रीलंका, बांगला देश व भूतान विभागासाठी कार्यकारी संचालक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले. २००२-२००४ या काळात त्यांनी भारत सरकारच्या वित्त खात्याचे सल्लागार म्हणूनही काम पाहिले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्च पदांवर काम करण्यासाठी त्यांना विविध सरकार व विदेशी संस्थांनी आमंत्रित केले. त्यांच्या कार्याचा, वेग व आवाकाच मोठा होता. नेमणूक मिळेल तिथे डॉ.केळकर यांनी देशाची सेवा केली. यामुळेच २०११मध्ये भारत सरकारने त्यांन पद्मविभूषण हा सन्मान प्रदान त्यांचा गौरव केला. - अनिल शिंदे

केळकर, शरद मनोहर कार्यकारी संचालक आशियाई विकास बँक, राज्य उद्योग आयुक्त २५ नोव्हेंबर १९३७ - १ मे १९८८ शरद मनोहर केळकर यांचा जन्म नागपूर येथे झाला. त्यांचे वडिल वकिल होते तर आजोबा दिवाण बहाद्दूर व्ही.एम.केळकर हे अकोला येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश होते. त्यांचे संपूर्ण शिक्षण नागपूर येथेच झाले. बालक मंदिर येथे प्राथमिक तर शालेय शिक्षण पटवर्धन विद्यालयात झाले. विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी १९५७ मध्ये गणित विषयात एम.एस्सी.ची पदवी घेतली. ते उत्तम क्रिकेटपटू होते. त्याचबरोबर टेनिसमध्येही त्यांनी नैपुण्य मिळवले होते. विज्ञान महाविद्यालयातच केळकर यांनी काळ काळ गणित विषय शिकवला. १९५७ मध्येच त्यांनी आय.ए.एस.ची परीक्षा दिली. या पहिल्याच प्रयत्नात ते यशस्वी झाले आणि भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांना प्रवेश मिळाला. दिल्ली, भावनगर तसेच नागपूर येथे येथे त्यांना प्रशिक्षण मिळाले. १९५९ मध्ये नागपूर येथे नाग विदर्भ आंदोलन झाले. या काळात त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखणे म्हणजे काय याचे प्रात्यक्षिकच पाहायला मिळाले. १९६० मध्ये केळकर यांचा विवाह मालती कुंटे यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांची उपविभागीय अधिकारी (सब डिव्हिजनल ऑफिसर) या पदावर मूर्तीजापूर येथे शिल्पकार चरित्रकोश १९९