पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क केळकर, विजय लक्ष्मण प्रशासन खंड पठाण लुटारूंवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांनी वायव्य प्रांतातील अधिकार्‍यांची मदत घेतली. या अधिकार्‍यांकडून त्यांनी पठाणांचे मानसशास्त्रही जाणून घेतले. त्यांनी पठाणांना देवाची भीती दाखवली. पठाणांसारख्या लढाऊ जमातीवर अशा प्रकारे वचक निर्माण करणे हे अत्यंत कठीण काम होते. डिसेंबर १९३२मध्ये मुंबई शहर पोलिसांचा मोटार ट्रान्सपोर्ट विभाग सुरू करण्यात आला आणि घोडेस्वार दल विभाग पूर्णपणे रद्द करण्यात आला त्या वेळेस सर केली यांनी मोटारकारच्या युगातही घोडेस्वार दलातील पोलीस अधिक कार्यक्षमतेने काम करू शकतात हे सरकारला पटवून दिले. अजूनही जगातल्या सर्वोत्तम पोलीस दलांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी घोडदळांचा समावेश केला जातो. ५फेब्रुवारी१९२९ या दिवशी पठाणांच्या एका टोळीने पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. हल्लेखोर पठाण समोर दिसेल त्याच्यावर तुटून पडत होते. एका पोलीस शिपायाला अत्यंत क्रूरपणे मारहाण करत असताना सर केली यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्याचे प्राण वाचवले. या महत्त्वाच्या कामगिरीबद्दल त्यांना १९२१ मध्ये किंग्ज पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. लोकांच्या मनांत त्यांच्याविषयी अत्यंत आदराची भावना होती. सर केली निवृत्त झाले तेव्हा मुंबईतील जनतेने उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन त्यांचा पुतळा मुंबईच्या पोलीस मुख्यालयासमोरील चौकात उभा केला होता. सध्या तो पुतळा क्रॉफर्ड मार्केट येथील संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे. - संपादित

केळकर, विजय लक्ष्मण अर्थतज्ज्ञ,तेराव्यावित्तआयोगाचेउपाध्यक्ष १५ मे १९४२ विजय लक्ष्मण केळकर यांचा जन्म विदर्भातील खामगाव येथे झाला. मुळचे औंध येथील केळकर यांचे शालेय शिक्षण पुणे येथे झाले. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण घेतले व १९६३ मध्ये त्यांनी यांत्रिकी व विद्युत याविषयात बी.ई. ही पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी १९६६ साली अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठातून एम.एस.केले. त्यांनी १९७० साली अमेरिकेतील बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठामधून अर्थशास्त्र या विषयात प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळविली. आपल्या पुढील आयुष्यात त्यांनी एकूण कार्यकाळात आर्थिक क्षेत्रातच सेवा बजावली. त्यात शेअर बाजार, वित्त आयोग अशा अनेक संस्थांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांनी बहुतेक संस्थांत किंवा सरकारी खात्यात उच्च पदावर कामे केली आहेत. १९७०मध्ये केळकर हैदराबादच्या ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ कॉलेज ऑफ इंडिया’ मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे असतानाच त्यांना नेपाळचे राष्ट्रीय आर्थिक नियोजन करण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर नेपाळी एअरवेज कॉर्पोरेशनचे दीर्घकालीन नियोजन त्यांनी केले. १९७७ मध्ये डॉ.केळकर हे केंद्र सरकारच्या व्यापार खात्याचे आर्थिक सल्लागार झाले. या पदावर ते १९८१ पर्यंत कार्यरत होते. पुढच्याच वर्षी त्यांनी केंद्र सरकारच्याच पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयात आर्थिक धोरण व नियोजन विषयक सल्लागार म्हणून सेवा बजावली. १९८५ साली राजीव गांधी पंतप्रधान असताना डॉ.केळकर यांची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे सचिव म्हणून नेमणूक झाली. एक वर्ष त्यांनी हे पद अत्यंत कार्यक्षमपणे सांभाळले. हे पद सांभाळत असतानाच १९८७ मध्ये त्यांना औद्योगिक खर्च व किंमत १९८ शिल्पकार चरित्रकोश