पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क प्रशासन खंड केली, पॅट्रिक संपुष्टात आला होता. मराठवाड्यात, परभणी जिल्ह्यात, मानवत जादूटोणा, जारणमारण नरबळी असे गूढ प्रकार आढळल्यामुळे प्रचंड घबराट उडाली होती. ही सर्व प्रकरणे रमाकांत कुलकर्णी यांनी आपल्या निरीक्षण, निष्कर्ष, गुन्हा अन्वेषण शास्त्र, गुन्हेगार मानसशास्त्र पद्धतीने तपास करून उलगडली. रमाकांत कुलकर्णी यांनी आपल्या पोलीस सेवेवर तीन इंग्रजी पुस्तके लिहिली असून त्यांपैकी एकाचे ‘मागोवा’ या नावाने मराठीत भाषांतर झालेले आहे. त्यात त्यांनी वरील प्रकरणांच्या तपासकार्याच्या कथा सांगितल्या आहेत. त्यातून कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक विलोभनीय पैलू ध्यानात येतो. तो असा की, गुन्हे तपासात कुलकर्णी तीव्र निरीक्षणशक्ती, तर्कसुसंगत विचार यांच्याइतकेच महत्त्व अतींद्रिय शक्तींना म्हणजे गुन्हेगाराचा जणू वास येणार्‍या ‘सहाव्या इंद्रिया’ला व परमेश्वराला देतात. विशेष अवघड तपासकाम करताना ते कुलदैवत मंगेशाची प्रार्थना करण्यात कसलाही कमीपणा मानत नाहीत. देवाने आपली प्रार्थना ऐकली व यश दिले हेदेखील ते कोणताही बुद्धिवादी आव न आणता स्पष्टपणे कबूल करतात. रमाकांत कुलकर्णी यांच्या कारकिर्दीचा कळस म्हणजे पंतप्रधान इंदिरा गांधी हत्येचा तपास. रीतसर खटला उभा राहण्यासाठी भरपूर पुरावा हवा होता. तो गोळा करणे हे काम फार अवघड होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शीख समाजावर भयंकर असे खुनी हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे एकंदर सामाजिक स्थिती कमालीची बिघडली होती. या सर्वांतून मार्ग काढून, इंदिरा गांधींच्या हत्येचे कारस्थान कसे शिजले याचा सज्जड पुरावा गोळा करून न्यायालयात सादर करणे, हे काम गुन्हे तपासाच्या दृष्टीने तर अवघड होतेच; पण राजकीय व सामाजिकदृष्ट्याही कमालीचे संवेदनशील होते. रमाकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेल अशाच तडफेने ते पार पाडले. शेवटी इंदिरा गांधींचे मारेकरी फासावर लटकले. अशा प्रकारे आपली कारकीर्द गाजवून १९८९ साली रमाकांत कुलकर्णी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक या पदावरून निवृत्त झाले. - मल्हार कृष्ण गोखले

केली, पॅट्रिक पोलीस आयुक्त-मुंबई जन्म-मृत्यू अनुपलब्ध पॅट्रिक केली हे मुंबईमधील अत्यंत लोकप्रिय आणि आदरणीय पोलीस आयुक्त म्हणून ओळखले जात असत. कायदा अमलात आणताना जुलूम-जबरदस्ती करू नये आणि शक्यतोे लाठीचा वापर टाळावा ही त्यांच्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये होती. पोलीस अधिकार्‍याने पारदर्शकतेने व प्रामाणिकपणे काम केले, तर ते लोकांच्या विश्वासास नक्कीच पात्र ठरतात, असे सर केली मानत असत. त्यामुळेच महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या असहकार चळवळीच्या काळात आणि तसेच केली यांच्या कार्यकालात निर्माण झालेल्या जातीय तणावांच्या पार्श्वभूमीवरदेखील त्यांना सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि पाठिंबा प्राप्त झाला हे सर्वांत मोठे वैशिष्ट्य मानले जाते. मुंबईच्या पोलीस पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी मुख्यत्वे दोन कामे स्वीकारली. पहिले काम म्हणजे पठाण टोळीचे पारिपत्य करणे. त्या वेळी या पठाण टोळ्यांनी अनेक ठिकाणी दरोडे, खून, लुटालुट करून दहशत निर्माण केली होती. सर केली यांनी स्वीकारलेले दुसरे महत्त्वाचे काम म्हणजे कापसाच्या सट्टेबाजीवर नियंत्रण निर्माण करणे. हे काम मात्र ते तडीस नेऊ शकले नाहीत. पण पठाण टोळ्यांचा मात्र त्यांनी चांगल्या प्रकारे बंदोबस्त केला. शिल्पकार चरित्रकोश १९७