पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क कुलकर्णी, रमाकांत शेषगिरी प्रशासन खंड महाराष्ट्र जल व सिंचन आयोगावर ते सदस्य म्हणून असताना त्यांच्या अनुभवाचा लाभ आयोगाला झालेला आहे. दांडेकर समितीच्या अहवालातील काही मुद्द्यांवर त्यांची भिन्न मते होती. त्याबद्दल त्यांनी भिन्नमतपत्रिका अहवालाला जोडली. याच मतपत्रिकेतील विचारांच्या आधाराने राज्यामध्ये प्रदेशा-प्रदेशांमधील विकासाचा असमतोल निवारण्यासाठी वैधानिक विकास मंडळांची निर्मिती झाली आहे. - डॉ. दि. मा. मोरे

कुलकर्णी, रमाकांत शेषगिरी भारतीयपोलीससेवा - पोलीसमहासंचालक १६ डिसेंबर १९३१ - २३ मार्च २००५ महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस - डी.जी.) रमाकांत कुलकर्णी यांच्याबद्दल माहिती घेताना, प्रथम गुप्तहेर कथांतील गाजलेले पात्र शेरलॉक होम्स आणि त्याचा जनक सर आर्थर कॉनन डॉयल यांची विस्तृत माहिती असणे आवश्यक आहे. कारण ‘भारताचे शेरलॉक होम्स’, असा जो त्यांचा अतिशय सार्थ गौरव का केला जातो का, हे समजण्यासाठी ही पार्श्वभूमी आवश्यक आहे. आपली अचूक निरिक्षणशक्ती आणि सुस्पष्ट तर्कसंगती यांच्या बळावर अनेक कूट प्रकरणांचा उलगडा हा कथानायक करतो. स्वातंत्र्यपूर्व काळातही फॉर्जेटसारखे निष्णात पोलीस अधिकारी होऊन गेले. पण रमाकांत कुलकर्णी यांनी गुन्हे संशोधनाला जे एक जवळपास परिपूर्ण अशा शास्त्राचे रूप दिले, ती त्यांची कामगिरी भारतीय गुन्हे-संशोधन क्षेत्रात युगप्रवर्तकच म्हटली पाहिजे. रमाकांत शेषगिरी कुलकर्णी यांचा जन्म कारवारमध्ये अवर्सा या ठिकाणी झाला. अंकोला येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले. तत्त्वज्ञान हा विषय घेऊन एम.ए. व पुढे एलएल. बी. करीत असताना काही काळ ते सेंट्रल बँकेत नोकरीही करत होते. १९५४ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. तत्त्वज्ञान आणि कायदा या विषयांचा त्यांनी जसा कसून अभ्यास केला होता, तसाच आता गुन्हे अन्वेषण शास्त्र, गुन्हेगार आणि त्याचे मानसशास्त्र याही विषयांचा त्यांनी अभ्यास केला. साहजिकच मुंबई पोलीस गुन्हेगारी प्रतिबंधक शाखेचे उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, प्रमुख संचालक; दिल्लीच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड फॉरेन्सिक सायन्स’ या अत्यंत महत्त्वपूर्ण संस्थेचे प्रमुख संचालक, अशी एकाहून एक वरचढ जबाबदारीची पदे त्यांच्याकडे येत गेली. १९८९ साली महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक (डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस - डी.जी.) या राज्यसरकारच्या सर्वोच्च पदावरून ते निवृत्त झाले. मुंबई, महाराष्ट्र आणि एकंदर देशभरात काही गुन्हेगारी प्रकरणे अतिशय गाजलेली आहेत. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे निवासस्थान, ज्याला राजभवन म्हणून ओळखले जाते, तिथेच झालेली चोरी; लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या फिरोज दारूवाला याने केलेले खून; चंद्रकला लोटलीकर नावाच्या महिलेचा प्रवासात झालेला खून; साम्यवादी पक्षाचे खासदार कृष्णा देसाई यांचा त्यांच्या अगदी बालेकिल्ल्यात शिरून केलेला खून, अशा प्रकरणांनी त्या-त्या वेळेला जनमानसात प्रचंड खळबळ उडवून दिली होती. रामन राघवन या खुन्याने तर लागोपाठ अनेक खून पाडून मुंबई आणि उपनगरांमधील रहिवाशांची झोपच उडवून टाकली होती. लोक कमालीचे घाबरले होते, आणि त्यांचा पोलीस खात्यावरचा विश्वास जवळपास शिल्पकार चरित्रकोश