पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

WANTWAL MEIN INTISTIA प्रशासन खंड कात्रे, मोहन गणेश नागपुरात बदली झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकाशझोतापासून अलिप्त याहून कार्य करत होता. याच दरम्यान बाळासाहेब देवरस आणि कर्णिक यांची भेट झाली. केंद्रीय पातळीला गुप्तचर खात्याकडून, कर्णिक यांची नागपुरात नियुक्ती होण्यापूर्वी, संघाबद्दल पारदर्शी आणि सत्यान्वेषी अहवाल पाठवले जात नव्हते. मात्र देवरसांचा स्पष्टवक्तेपणा आणि पारदर्शकता यांमुळे कर्णिकांनी संघाबद्दल-संघकार्याबद्दल प्रांजळ आणि पारदर्शी अहवाल पाठवले आणि खर्‍या अर्थाने राष्ट्रीय सलोखा राखण्यास मदत केली. विशेष म्हणजे नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाशजींची संपूर्ण क्रांती, देशातील आणीबाणी या तुलनेने आव्हानात्मक कालखंडात कर्णिक यांनी आपली निष्कलंक प्रतिमा अबाधित राखली. १९७७ ते १९८७ या दहा वर्षांच्या कालखंडामध्ये कर्णिक यांनी पुन्हा एकदा दिल्ली येथे विविध ‘डेस्क’ वर साहाय्यक संचालक या पदावर काम केले. या कालखंडात त्यांनी गुप्त तपास, माहिती संकलन-पृथक्करण, महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींची सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा, मनुष्यबळ प्रशिक्षण, विविध मोहिमांची आखणी आणि अंमलबजावणी असे विविध स्वरूपाचे कार्य केले. १९९०मध्ये अशोक कर्णिक महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांचे उपसंचालक या पदावरून निवृत्त झाले. सेवाकाळात असतानाही आपली टेनिसची आवड त्यांनी मनस्वीपणे जोपासली. प्रशासकीय सेवकांच्या कामगिरीनुसार ‘गतिशील बढती’ ‘अ‍ॅक्सलरेटेड प्रमोशन’ राबविण्याची संकल्पना कर्णिक यांनी मांडली. त्यांच्या या अत्युत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना १९७८मध्ये भारतीय पोलीस पदक आणि १९८७मध्ये सन्मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक हे प्रशासकीय सेवांमधील सर्वोच्च पुरस्कारही मिळाले. निवृत्तीनंतरही आज ते संरक्षण क्षेत्राबाबत सक्रिय आहेत. दहशतवाद हा त्यांचा अभ्यासाचा विषय असून, विविध शाळा-विद्यालये- फोरम यांमध्ये ते या संदर्भात व्याख्याने देतात. ‘फ्रिडम फर्स्ट’ या मासिकामध्ये ते नियंत्रित संरक्षणविषयक लेख प्रसिद्ध करतात. २००६ ते २०१० या कालावधीत ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी’ या संस्थेच्या महाराष्ट्र विभागाचे ते प्रमुख होते. तसेच निवृत्तीनंतर गोदरेज आणि फिलिप्स यांसारख्या कंपन्यांमध्ये त्यांनी संरक्षणविषयक सल्लागार म्हणून काम केले. - स्वरूप पंडित

कात्रे, मोहन गणेश महासंचालक, केंद्रीय अन्वेषण विभाग ११ ऑक्टोबर १९२९ - १९ मार्च २००३ मोहन गणेश कात्रे यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे या गावी झाला. त्यांचे वडील हे स्वातंत्र्यपूर्व काळात न्यायव्यवस्थेमध्ये कार्यरत होते. न्यायव्यवस्थेतील विविध पदांवर काम केल्यावर ते १९५३मध्ये जिल्हा न्यायाधीश या पदावरून बेळगाव येथून निवृत्त झाले. नोकरीनिमित्ताने वडिलांच्या सतत होणार्‍या बदल्यांमुळे मोहन कात्रे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण महाराष्ट्रात विविध ठिकाणी झाले. मुंबई येथील एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्र आणि इ शिल्पकार चरित्रकोश