पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क कर्णिक, अशोक वसंत प्रशासन खंड अधिकच प्रकाशमान झाले. त्यानंतर सात-आठ महिन्यांनंतरच पाकिस्तानी अतिरेक्यांच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना त्यांना कामा इस्पितळ, मुंबई येथे हौतात्म्य प्राप्त झाले. कुलाबा, सीएसटी, कामा इस्पितळ परिसरात २६ नोव्हेंबर २००८ च्या सायंकाळी, सीएसटी येथील परिसरात अतिरेकी घुसल्याची बातमी मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने आखणी केली आणि ते अतिरेक्यांच्या मागावर निघाले. परंतु, अतिरेक्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत ह्या शूर, अभ्यासू आणि सुसंस्कृत पोलीस अधिकार्‍याला आपल्या प्राणास मुकावे लागले. भारत सरकारने हेमंत करकरे ह्यांना ‘अशोकचक्र’ हा पुरस्कार दिला. त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती कविता करकरे ह्यांनी तो स्वीकारला. - संदीप राऊत

कर्णिक, अशोक वसंत उपसंचालक केंद्रीय गुप्तचर विभाग १३ डिसेंबर १९३१ अशोक वसंत कर्णिक यांचा जन्म गिरगावातला. त्यांच्या वडिलांचे नाव वसंत भगवंत कर्णिक, तर आईचे नाव विमलाबाई. कर्णिक यांचे आजोळ (आईचे माहेर) बडोदा येथील सरदार आंबेगावकर यांच्याकडील, तर वडील मात्र मानवेंद्रनाथ रॉय यांचे अत्यंत निकटचे सहकारी. कर्णिकांचे बालपण हे अशा वातावरणात, मुंबईमध्येच घडलेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण आर्यन हायस्कूल या शाळेत, तर गिरगावातील विल्सन महाविद्यालयात कर्णिक यांचे शिक्षण झाले. एकीकडे शालेय शिक्षण सुरू असतानाच, घरामध्ये प्रत्यक्ष एम.एन.रॉय यांच्यासह अनेक कम्युनिस्ट विचारवंतांचे, अभ्यासकांचे, कामगार चळवळीतील नेत्यांचे, महाराष्ट्र टाइम्सचे संस्थापक-संपादक असणार्‍या डी.व्ही.कर्णिकांसारख्या लेखकांचे सहवास लाभल्याने वैचारिक बैठक घडत होती. १९५२ मध्ये रसायनशास्त्र हा मुख्य विषय घेऊन, मुंबई विद्यापीठामधून, कर्णिक यांनी बी.एस्सी. ही पदवी संपादन केली. अशोक कर्णिक १९५३मध्ये भारताच्या केंद्रीय गुप्तचर विभागात निवडले गेले. १९५३ ते १९५६ या तीन वर्षांच्या काळात माउंट अबू येथील इंडियन पोलीस अकॅडमी येथे कर्णिक यांचे प्रशिक्षण झाले. या दरम्यानच कायदे, वैद्यकीय न्यायशास्त्र (फॉरेन्सिक सायन्स) अशा विविध विषयांचा त्यांनी अभ्यास केला. १९५६ ते १९६२ या काळात त्यांनी दिल्ली येथे गुप्तचर खात्याशी संलग्न अशी अनेक महत्त्वाची कामे केली. भारताच्या अंतर्गत, तसेच बाह्य सुरक्षेला धोका निर्माण करणार्‍या शक्तींना ‘निष्क्रिय’ करणे, त्या अनुषंगाने आवश्यक ती माहिती गोळा करणे, तिचे पृथ:क्करण करणे असे या कालावधीमधील कामाचे मुख्य स्वरूप होते. १९६२मध्ये तत्कालीन गुप्तचर खात्याचे प्रमुख श्री.मलिक यांनी भारताचा ईशान्येकडील राज्यांमध्ये प्रशासकीय दाव्यांबरोबरच भारताच्या कायदेशीर हक्कही अबाधित राहावा म्हणून गुप्तचर खात्यातील नव्याने भरती झालेल्या युवकांना सीमावर्ती भागात पाठविण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे अशोक कर्णिक यांची ‘फर्नो’ भागात बदली झाली. तावांग येथून काही अंतरावर गुप्तचर खात्याचे ‘कँप’ उभारण्याची अवघड जबाबदारी, सर्व नैसर्गिक आपत्तींना तोंड देत, आणि इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांच्या सहकार्याने कर्णिक यांनी पार पाडली. दरम्यान अरुणाचल प्रदेश आणि अन्य ईशान्य राज्यांमध्ये विकास काम करण्याचे आणि तेथील जनतेमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. स्थानिक लोकांना जागृत करणे, प्रशिक्षण देणे, त्यांना सुशिक्षित करणे असे या कामाचे अनेक पैलू होते. १९७२ ते १९७७ या काळात कर्णिक यांची १८२ शिल्पकार चरित्रकोश