पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रशासन खंड करंदीकर, प्रभाकर दत्तात्रेय क क करंदीकर, प्रभाकर दत्तात्रेय उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म.प्र.से विभागीय आयुक्त पुणे ३० डिसेंबर १९४९ प्रभाकर दत्तात्रेय करंदीकर यांचा जन्म बारामती येथे झाला. त्यांचे वडील आणि आजोबाही वकील होते. त्यांचे वडील अत्यंत तत्त्वनिष्ठ आणि सात्त्विक वृत्तीचे होते. १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांना कारावासही झाला होता. पण त्यासाठी मिळणारे मान आणि मानधन त्यांनी स्वीकारले नाही. प्रभाकरांच्या मातोश्री पद्माताई, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या पदवीधर होत्या. त्यांनी गीता व संत साहित्याचा सखोल अभ्यास केला होता. प्रज्ञा, प्रतिभा आणि कर्तृत्व याचा सुंदर मिलाफ प्रभाकर करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांनी आपल्या संपूर्ण प्रशासकीय कारकिर्दीवर आपल्या स्वच्छ आणि कर्तव्यनिष्ठ कामगिरीची मोहोर उठवली. त्यांचे माध्यमिक शिक्षण बारामतीच्या म.ए.सो. विद्यालयात झाले. शालान्त परीक्षेत बोर्डात त्यांचा चव्वेचाळीसावा क्रमांक आला. त्यांना राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील फर्गसन महाविद्यालयात झाले. या काळात अभ्यासाबरोबरच अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांनी लौकिक मिळवून आपली रसिकता प्रगट केली. १९६९ मध्ये राज्यशास्त्र विषयात पुणे विद्यापीठात प्रथम क्रमांकाचे वझे पारितोषिक मिळवून ते बी.ए. झाले. याच विषयात एम.ए. करून ते आय.ए.एस. झाले आणि भारतीय शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी पुणे जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख, सोलापूर येथे जिल्हाधिकारी, शेती महामंडळ, सी.कॉम, रस्ते महामंडळ अशा जबाबदार्‍या कौशल्याने पेलल्या. पंढरपूर क्षेत्रातील श्री दर्शनाची व्यवस्था हे त्यांचे उल्लेखनीय काम. शेती महामंडळाचे कार्यकारी संचालक असताना त्यांनी पडीक जागेत सुबाभूळ, सिल्व्हर ओक, साग यांच्या लागवडीला चालना दिली. पुणे येथे विभागीय आयुक्त म्हणून अतिशय उल्लेखनीय काम केले. बचतगटांच्या अगदी प्राथमिक अवस्थेत उत्कृष्ट मार्गदर्शन करून बँकेच्या माध्यमातून बचतगटांच्या कार्याचा पाया भक्कम केला. त्यांनी आर.एम.डी.आर. पुणे या संस्थेची ‘डिप्लोमा इन बिझिनेस अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट’ ही पदवी १९८२मध्ये मिळवली. १९८८मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत अभ्यास करून एम.एस्सी. ही पदवी मिळवली. त्यांनी सार्वजनिक आरोग्य, प्रगतीच्या पद्धती, नागरी नियोजन इत्यादी विषयांचा सखोल अभ्यास केला. यासाठी भारत सरकारने विशेष शिष्यवृत्ती देऊन त्यांना इंग्लंडला पाठवले होते. आपल्या शासकीय सेवेत त्यांनी मुंबई महानगर पालिका उपायुक्त (१९८५ ते १९८८), महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट-मुख्य कार्यकारी अधिकारी (१९९१-१९९४), सीकॉम-व्यवस्थापकीय संचालक (फेब्रुवारी १९९४ ते एप्रिल १९९७), ग्रामीण विकास शिल्पकार चरित्रकोश १७९