पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

क करकरे, हेमंत कमलाकर प्रशासन खंड सचिव (जून १९९७ ते एप्रिल १९९८), अणुऊर्जा आयोग सहसचिव (अर्थ)-१९९८ ते २००१, रस्ते विकास महामंडळ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक-२००१ ते २००३, पुणे विभागीय आयुक्त - जून२००३ ते एप्रिल२००७ आदी पदांवर यशस्वीरीत्या काम केले. पुणे विभागीय आयुक्तपदी काम करत असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. सध्या ते ‘महिंद्र अँड महिंद्र’ मुंबई या कंपनीत कॉर्पोरेट सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. अत्यंत कर्तबगार, शिस्तप्रिय व पारदर्शक अधिकारी म्हणून करंदीकरांना अनेकवेळा गौरविले गेले आहे. भारत सरकारतर्फे १९८२मध्ये सोलापूर जिल्हा जनगणनेच्या कामातील कुशल संचालनासाठी राष्ट्रपती पदक देण्यात आले. १९९२मध्ये औद्योगिक पायाभूत सुविधा आणि विकास क्षेत्रातील योगदानासाठी नेशन सिटिझन कमिटी, नवी दिल्ली तर्फे पुरस्कार, १९९३ मध्ये औद्योगिक विकास क्षेत्रातील योगदानासाठी उद्योग रत्न पुरस्कार, टॉप मॅनेजमेंट कन्सॉर्शिअम- पुणेच्या वतीने प्रशासन कौशल्यासाठी जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले गेले आहे. करंदीकर हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून जसे गौरवास पात्र आहेत त्याप्रमाणेच त्यांचे मन अतिशय संवेदनशील आहे. ते एक प्रतिभासंपन्न कवी व लेखक आहेत. त्यांच्या चौफेर ज्ञानामुळे राज्य शासनामार्फत जी अभ्यास मंडळे नेमली जात त्यात त्यांचा समावेश असे. त्यामुळे त्यांचा जगभरातील अनेक देशांत प्रवास झाला. त्यांचे इंग्लिश मासिकांतून तसेच दैनिके व नियतकालिकांतून प्रशासन, अर्थकारण या विषयावर अनेक अभ्यासपूर्ण लेख प्रसिद्ध झाले. त्यांची ‘आदिबंध’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. - विजया सस्ते

करकरे, हेमंत कमलाकर दहशतवादविरोधी पथक प्रमुख १२ जुलै १९५४ - २६ नोव्हेंबर २००८ मुंबई पोलीस सेवेमधील अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी व्यक्तिमत्त्व अशी ख्याती लाभलेले हेमंत कमलाकर करकरे ह्यांचा जन्म मध्यप्रदेशातील आमला ह्या खेड्यात झाला. वडिलांची रेल्वेत नोकरी असल्यामुळे बदलीमुळे सतत शहरे, गावे बदलत राहावी लागायची, त्यामुळे तीन भाऊ, एक बहीण आणि आईवडिलांसह करकरे यांचे बालपण आणि शालेय, महाविद्यालयीन शिक्षण विविध शहरांत पूर्ण झाले. मध्यप्रदेशातून पुढे वर्धा येथील वास्तव्यात त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षण नागपुरात न्यू इंग्लिश हायस्कुलामध्ये घेतले. नागपुरातच सर विश्वेश्वरय्यांच्या महाविद्यालयातून यांत्रिकी अभियांत्रिकी ही पदवी प्राप्त केली. शाळेत त्यांचा नेहमी पहिलाच क्रमांक असायचा. करकरे यांच्या मातोश्रीदेखील बी.ए., एम.ए., एम.एड. अशा उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनातून तयार झालेल्या हेमंत करकरे यांनी ‘पहिलीचा सगळा अभ्यास पाठ येतो’ म्हणून बदलीच्या ठिकाणच्या वर्धा येथील शाळेच्या पहिलीच्या वर्गात बसण्यास नकार दिला आणि दुसरीत बसण्याचा हट्ट धरला. मुळातच तल्लख बुद्धीच्या हेमंत करकरे ह्यांनी अभियांत्रिकीनंतर टाटा १८० शिल्पकार चरित्रकोश