पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ ते हो । । प्रशासन खंड एडवर्डस, स्टीफन मेरिडिथ चळवळीने नोव्हेंबर १९९३ मध्ये उसळी मारून उग्र रूप धारण केले. मुख्यमंत्री शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करून, जवळजवळ संमती मिळवली आणि १४जानेवारी१९९४ रोजी या बाबतचा अध्यादेश जारी करून या ज्वलंत प्रश्नास पूर्णविराम दिला. मुख्य सचिव या नात्याने रघुनाथन यांनी कायदा व सुव्यवस्था चिघळू न देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. स्काउट व गाइडच्या अनुदानाचा प्रश्न समोर आला तेव्हा त्या संस्थेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. केंद्रीय लोकसेवा आयोगासमोर झालेल्या त्यांची मुलाखत झाली होती. तेव्हा आयोगाच्या अध्यक्षांनी रघुनाथन यांच्या शालेय जीवनातील समाजकार्याविषयी विचारले व त्यांचा स्काउटमध्ये सहभाग होता हे ऐकून त्याचे नियम विचारले. अचूक उत्तराने अध्यक्षांचे समाधान झाले. आय.ए.एस.साठीची मुलाखत पंधरा मिनिटांतच संपली आणि रघुनाथन ती परीक्षा उत्तीर्ण झाले. शालेय जीवनात स्काउटच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा केली आणि प्रशासक या नात्याने ती अखंडपणे चालू ठेवली. रघुनाथन यांनी मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविलेच, त्याचप्रमाणे पंजाबी, गुजराती व तामीळमध्येही ते सहज वार्तालाप करू शकत. त्यांची स्मरणशक्ती जबरदस्त असून संस्कृत व पुरातत्त्व हे त्यांचे आवडीचे विषय होते. ज्योतिषशास्त्रावर त्यांचा विश्वास व त्याचा अभ्यास असला तरी त्यांनी प्रशासनाच्या कामात कोणताही अडथळा येऊ दिली नाही. विवेकी असल्याने कोणत्या कर्तव्याला प्राथमिकता द्यावी याचा ते निर्णय घेत. परदेश प्रवासाच्या संधीवर पाणी सोडून ते कर्करोगग्रस्त वडिलांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणी हजर राहिले. आपल्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रात योग्य रेशन -पुरवठ्याची पद्धत राबवली. राज्य लॉटरी सुरू करण्याचे श्रेय त्यांनाच आहे. शेतकर्‍याकडील कापूस वाजवी भावात खरेदी करण्याची यशवंतराव मोहिते यांची कल्पना कार्यान्वित करण्यात त्यांनी मोठा हातभार लावला आणि अशी योजना महाराष्ट्रात तालुका पातळीपर्यंत राबविण्याचा धाडसी निर्णय घेतला. शासनातर्फे केंब्रिज येथे जाऊन त्यांनी पदव्युत्तर पदवी संपादन केली. रघुनाथ आपल्या निर्णयावर ठाम असत. कोणतेही प्रलोभन त्यांना विचलित करू शकले नाही. सेवानिवृत्तीनंतर मुदतवाढ न स्वीकारण्याचा निर्णय हे याचे ज्वलंत उदाहरण. आदर्श प्रशासक कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणून एन.रघुनाथन यांचा निर्देश करावा लागेल. आस्थापूर्ण कार्यशैली व तत्परतेने वागणारा हा प्रशासक देशाच्या राजधानीत जन्मला आणि आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत शिल्पकाराची भूमिका यशस्वीपणे पार पाडून त्याच राज्याच्या ‘मुंबई’ या राजधानीत निधन पावला. - वसंत फातर्पेकर

एडवर्ड्स, स्टीफन मेरिडिथ पोलीस आयुक्त - मुंबई इलाखा जन्म दिनांक अनुपलब्ध-१ जानेवारी १९२७ स्टीफन मेरिडिथ एडवर्ड्स हे भारतीय नागरी सेवेतून पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केलेले एकमेव सदस्य अधिकारी होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी (कमिशनर) नेमणूक व्हायच्या आधी त्यांनी मुंबईत विविध जागांवर काम केले होते. त्यामुळे त्यांना त्या शहराची, तेथील लोकसंख्येची, इतिहासाची माहिती होती. १९०८मध्ये लो.टिळकांच्या पुढाकाराने मुंबईत झालेल्या उठावानंतर, मुंबईच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीचा विचार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या 7 शिल्पकार चरित्रकोश १७५