पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ ते । हो । एन. रघुनाथन प्रशासन खंड महाविद्यालयामधून त्यांनी १९५७मध्ये प्राचीन इतिहास विषयात प्रथम श्रेणीत एम.ए. पदवी मिळवली. महाविद्यालयात अल्पकाळ अधिव्याख्याता म्हणून काम करताना ते १९५९ मध्ये आय.ए.एस. परीक्षेत उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रात प्रशासनिक सेवेत दाखल झाले. त्यांनी ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती येथे व मंत्रालयात काम केले. केंद्रीय कार्यालयात अन्न, नागरी पुरवठा, संरक्षण, नियोजन विभागात काम करून, व्यापक अनुभव घेऊन १९९३-९४ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यसचिव पद त्यांनी यथार्थपणे भूषविले. १९९३ सालच्या अभूतपूर्व घटनांनी रघुनाथन यांच्या गुणवत्तेची जितकी सखोल, तितकीच व्यापक परीक्षा घेतली. विशेष म्हणजे ज्या दिवशी त्यांनी कार्यभार स्वीकारला, त्याच दिवशी दुपारी १-२० वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत मुंबई एका पाठोपाठ झालेल्या बारा स्फोटांच्या मालिकेने हादरून गेली. २६० माणसे मृत्युमुखी, ७१३ जखमी व सुमारे ५० कोटीच्या मालमत्तेची हानी झाली. धैर्य व प्रसंगावधान राखून रघुनाथन यांनी ताबडतोब वरिष्ठ पोलीस व वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांना तत्काळ अचूक आदेश दिले. त्यामुळे सर्वत्र नाकेबंदी, वाहने तपासणे, टेलिफोन व वीज सेवा पूर्ववत आणणे, मोक्यांच्या जागी गस्त घालणे, स्फोट झालेल्या रक्तरंजित जागा धुऊन साफ करणे, इत्यादी विविध कामे त्यांनी युद्धपातळीवर करवून घेतली. आठवडाभर रघुनाथन स्वत: रोज अठरा तास काम करून राज्यातील एकूण परिस्थितीवर बारीक नजर ठेवून होते. त्यानंतर दुसरा असाच कसोटीचा क्षण लातूरच्या भूकंपामुळे आला. ३० सप्टेंबर १९९३ रोजी सकाळी चार वाजता लातूर व आसपासच्या भागांत ६.४ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यात लातूर जिल्हा व उमरगा तालुक्यातील ६७ गावे भूकंपाच्या तडाख्यात सापडली. जवळजवळ दहा हजार मृत्यू, सोळा हजार जखमी झाले व तीस हजार घरे पडली, अशी या भूकंपाची तीव्रता होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भूकंप होण्याचा हा महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील पहिला प्रसंग होता. रघुनाथन यांना या दुर्घटनेची सूचना पोलीस बिनतारी यंत्रणेवर सकाळी ६-०० वाजता मिळताच ते कार्यालयात पोहोचले, मंत्रालयाजवळच्या निवासातील सर्व सचिवांना त्यांनी तत्काळ बोलावून, (नियंत्रण कक्ष) (कंट्रोल रूम) ची स्थापना करून तेथे सचिव दर्जाचे अधिकारी २४ तास कार्यरत ठेवले आणि भूकंपग्रस्तांना लवकरात लवकर मदत पोहोचेल अशी व्यवस्था केली. यात प्रमुख कंपन्या, स्वयंसेवी संस्था, जवळची राज्य सरकारे यांच्याकडून, लष्कराकडून साहाय्य घेतले. लातूर, किल्लारी, उस्मानाबाद, उमरगा, सोलापूर येथे थेट दूरध्वनी (डायरेक्ट टेलिफोन, हॉटलाइन) सेवा उपलब्ध केली. तंबूसाठी बांबू, पाले, डॉक्टरांची पथके, औषधे, धान्य, बेकरी उत्पादने, कपडेलत्ते, दूध इत्यादी आवश्यक वस्तू गोळा करवून त्यांची तत्परतेने रवानगी केली गेली. महत्त्वाचे म्हणजे रक्तपुरवठ्यासाठी रक्तपेढीची व्यवस्था केली आणि अध्येमध्ये कुठेही गैरवापर, गडबड न होता ही मदत भूकंपग्रस्तांपर्यंत पोहोचली. तेथे उत्तम वितरण व्यवस्था केली. अनेक औद्योगिक संस्थाही मदतीला धावून आल्या. मंत्रालयातील २४ तास कार्यरत नियंत्रण कक्षासाठी उपाहारगृहही जवळजवळ २४ तास काम करीत असे. प्रस्तुत मदतकार्यात जागतिक बँकेनेही योगदान दिले आणि योग्य विनियोग होतो आहे यावर लक्ष ठेवले. कसलेले प्रशासक एन. रघुनाथन यांच्यावर विलंबाचा डाग लागला नाही हे नमूद केले पाहिजे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणाचा ठराव वास्तविक १९८० मध्येच झाला होता. परंतु त्या १७४ शिल्पकार चरित्रकोश हैं