पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अ ते । औ । एकबोटे, माणिक श्रीकृष्ण प्रशासन खंड आणल्या. महामंडळाच्या कार्यालयांचे त्यांनी संगणकीकरण केले. त्यामुळे संगणकीकृत तिकीट केंद्रांची सुरुवात झाली. अशा काही सुधारणांमुळे परिवहन महामंडळ नफ्यात आले. राज्याचे उद्योग सचिव पद भूषविल्यानंतर केंद्र सरकारात ‘कंपनी लॉ बोर्डा’चे अध्यक्ष व त्यानंतर ‘ब्युरो ऑफ इंडस्ट्रियल कॉस्टस् अ‍ॅन्ड प्राईसेस’चे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदावरून १९८८ मध्ये उपासनी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही ते कंपनी कायदाविषयक सेवा देतात. त्यांनी वाणिज्य, बँकिंग, कायदा आणि व्यवस्थापनाची पार्श्वभूमी आणि व्यवस्थेमधील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आहे. उत्तम मार्गदर्शक म्हणून त्यांचा लौकिक आहे. ‘महाराष्ट्र बोर्ड ऑफ रिकन्स्ट्रक्टिंग ऑफ स्टेट एन्टरप्रायझेस’च्या अध्यक्षपदावरही त्यांनी काम केले आहे. याअंतर्गत सार्वजनिक उपक्रमांचे व्यवस्थापन व पुनर्रचना यासंबंधी अभ्यासपूर्ण शिफारशी त्यांनी शासनास केल्या होत्या. विश्‍व व्यापार केंद्र (वर्ल्ड ट्रेड सेंटर), मुंबईच्या उपाध्यक्षपदी तसेच ग्राहक मार्गदर्शक सोसायटीचे अध्यक्ष, ‘ब्रिटिश गॅस कंपनी’चे सल्लागार या पदांवरही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (भेल) या कंपनीत संचालक पदावर त्यांची २००१ मध्ये नेमणूक झाली. या पदावर त्यांनी चार वर्षे काम केले. - प्रभाकर करंदीकर

एकबोटे, माणिक श्रीकृष्ण भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवा ११ ऑगस्ट १९४३ माणिक श्रीकृष्ण एकबोटे यांचा जन्म राजस्थानातील कोटा या गावी झाला. त्यांचे वडील श्रीकृष्ण हरी एकबोटे कोटा येथील शासकीय महाविद्यालयात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते. माणिक एकबोटे हे पंधरा वर्षांचे असताना त्यांच्या पितृछत्र हरपले. माणिक एकबोटे यांचे प्राथमिक शिक्षण कोटा येथील न्यू हायस्कूलमध्ये झाले. १९५७ साली ते दहावी उत्तीर्ण झाले, तर १९५९ साली ते इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांचे अभियांत्रिकी शिक्षण मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. येथे झाले. १९६२ साली त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीतून बी.ई.ची पदवी घेतली. त्या वेळी त्यांचा क्रमांक विद्यापीठात दुसरा आला होता. त्यानंतर त्यांनी १९६२ ते १९६४ या कालावधीत बंगलोरच्या भारतीय विज्ञान संस्था या जगप्रसिद्ध संस्थेतून अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि १९६४ साली त्यांनी राऊरकेला येथील पोलाद कारखान्यात साहाय्यक आरेखन अभियंता म्हणून कामाला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी १९६५ साली केंद्रीय लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकीची परीक्षा दिली आणि संपूर्ण भारतातून ते दहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांची भारतीय रेल्वेच्या अभियांत्रिकी सेवेमध्ये निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना जानेवारी १९६९ साली अहमदाबाद ते कांडला या नवीन रेल्वेमार्गाच्या निर्मितीच्या कामावर साहाय्यक अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर १९७१ साली गुजरात येथे विद्युत मंडळासाठी कोळसा वाहून नेण्याच्या कामावरचा बांधण्यात येणार्‍या रेल्वेमार्ग कामावर कार्यकारी अभियंतापदावर बढती देण्यात आली. विद्युत मंडळासाठी ने-आण करणार्‍या रेल्वेमार्गातील अडथळे दूर करून कारखान्यापर्यंतचा रेल्वेचा मार्ग बनवण्यात आला. त्यामुळे विद्युतनिर्मिती केंद्रावर लागणार्‍या कोळशाच्या गाड्या जाणे शक्य झाले. यानंतर त्यांना १९७३ साली भारतीय रेल्वे अनुसंधान, अभिकल्प व मानक संगठन लखनऊत साहाय्यक १७२ शिल्पकार चरित्रकोश