पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ते । ALI औ । । । प्रशासन खंड उपासनी, शरद पांडुरंग वातावरण निकोप राहावे यासाठीही लक्ष दिले. आत्तापर्यंत त्यांनी वृक्षारोपण मोहिमेनुसार आठ लाखांहून अधिक झाडे लावली आहेत. त्यांना देशभरातून विविध संस्था व्याख्यानासाठी निमंत्रित करतात. त्यांनी आजवर ५०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. यापोटी मानधन म्हणून मिळालेली सात लाखांपेक्षा अधिक रक्कम त्यांनी ती विविध धर्मादाय संस्थांना अर्पित केली आहे. अरविंद इनामदार यांच्या पत्नी अंजली यांनी ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)ची पदवी संपादित केली आहे. त्यांच्या दोन्ही कन्या उच्च शिक्षित आहेत. मोठी पद्मा हिने पीएच.डी. मिळविली आहे, तर जुई ही एम.ए. झाली आहे. - विजयकुमार बांदल

ई. श्रीधरन् इलाटूवलापिल श्रीधरन् ऋ मुख्य नोंद - विज्ञान व तंत्रज्ञान खंड

उपासनी, शरद पांडुरंग मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य १ ऑक्टोबर १९३८ शरद पांडुरंग उपासनी यांचा जन्म नंदुरबार येथे झाला. बडोदा येथील सयाजी विद्यापीठातून त्यांनी बी.कॉम. पदवी प्राप्त केली, तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम.कॉम. पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठातूनच एलएल.बी. पदवीही त्यांनी १९६१ मध्ये मिळवली. १९६२ मध्ये उपासनी भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. १९६८ मध्ये त्यांनी हवाई विद्यापीठ, अमेरिकेतून एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रशासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्य आणि राष्ट्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याची संधी मिळाली. काही काळ ते गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. तसेच काही काळ केंद्र सरकारात वित्त मंत्र्यांचे (यशवंतराव चव्हाण) ते विशेष साहाय्यक होते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी (वॉशिंग्टन) येथे १९७४ ते १९७८ या कालावधीत त्यांची नेमणूक झाली. महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरही उपासनी यांनी काम केले. त्यांच्या कार्यकाळात महामंडळाच्या ताब्यातील प्रत्येक कापड गिरणी नफ्यात आली. उपासनी यांनी केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाचे सहसचिव म्हणूनही काम पाहिले. या काळात म्हणजे १९८२ मध्ये देशात पहिल्यांदाच आशियाई खेळ आयोजित केले गेले. या खेळांच्या प्रसारणासाठी त्यांनी संपूर्ण देशात चाळीस प्रक्षेपकांची उभारणी केली. त्यामुळे देशाच्या चौर्‍याण्णव टक्के भागात दूरदर्शनच्या माध्यमातून या खेळांचे प्रसारण पोहोचले. या काळात दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम कृष्णधवल स्वरूपात दिसत असत. या कार्यक्रमांच्या रंगीत प्रसारणाला उपासनी यांनीच सुरुवात केली. वार्तांकनासाठी कार्यक्रमस्थळी जाऊन चित्रण करता येईल, संकलन करता येईल अशा बाह्य प्रक्षेपणासाठी वापरण्यात येणार्‍या गाड्यांच्या (ओ.बी. व्हॅनच्या) वापराला त्यांनी चालना दिली. महावित्तच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर त्यांनी सर्व आघाड्यांवर उत्तम कामगिरी केली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) उपाध्यक्ष पदावर त्यांनी १९८४ ते १९८७ या काळात काम केले. या काळात त्यांनी महामंडळाच्या कारभारातही काही लक्षणीय सुधारणा घडवून शिल्पकार चरित्रकोश