पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तस्करी, बनावट चलनाचा प्रसार व अतिरेकी, फुटीर चळवळी या सगळ्यांमध्ये अंतर्गत संबंध आहेत. हे सगळेच एकमेकांच्या सहाय्याने कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी विशेष गट, आय, बी. आणि रॉ यांच्यात उत्कृष्ट समन्वय असण्याची गरज आहे. आय. बी, आणि रॉ या दोन्ही संस्था शक्तिमान बनवण्याची व देशाच्या सुरक्षेचे काम त्या अधिक जबाबदारीने पार पाडतील हे पाहण्याची गरज आहे. गुप्तवार्ता संस्थांसमोरील कार्य अवघड तर आहेच; पण भारतीय राष्ट्राची सुरक्षा सैन्य दलांप्रमाणेच गुप्तवार्ता खात्यांच्याही हातात आहे. (भावानुवाद : मल्हार गोखले) - अशोक कर्णिक T: भारतीय रेल्वे प्रशासकीय सेवा भारतात पहिली रेल्वे १६ एप्रिल १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. प्रथम भारतभर रेल्वे निर्माण व चालन हे खाजगी कंपन्या, ज्या बहुतांशी इंग्लंडमध्ये प्रस्थापित झाल्या होत्या त्यांच्या द्वारे होत असे. परंतु अनेक कारणांमुळे त्यांची कामगिरी समाधानकारक होत नसल्यामुळे ब्रिटिश सरकारने १९२५ पासून त्यांचे राष्ट्रीयीकरण सुरू केले. स्वातंत्र्य मिळाल्यावर, म्हणजे १९४८ मध्ये अशा अठेचाळीस निरनिराळ्या कंपन्या व खाजगी (राजामहाराजांच्या रेल्वे भारतात होत्या, त्यांचे राष्ट्रीयीकरण करून त्या सर्व रेल्वे बोर्डाच्या आधिपत्याखाली आल्या. भारत सरकारात रेल्वे बोर्ड ही एकमेव संस्था अशी आहे की ती रेल्वे मंत्रालयाचेही कार्यपण करते. त्यामध्ये रेल्वे बोर्ड अध्यक्षा व्यतिरिक्त सहा सदस्य, सदस्य वित्त, सदस्य यातायात, सदस्य सिव्हिल, सदस्य अभियांत्रिकी, सदस्य विद्युत व सदस्य कार्मिक असे असतात. | ह्या शिवाय रेल्वे बोर्डाच्या आधिपत्याखाली अनेक इंजिन निर्मिती, कोच निर्मिती इत्यादीचे कारखाने, कोकण रेल्वे, राईटस् सारखे अनेक बी.एस्.यू., रेल्वे स्टाफ कॉलेज या सारखी महत्त्वाची प्रशिक्षण केंद्रे आहेत. अधिका-यांची निवड संघ लोक सेवा आयोग (यु.पी.एस्.सी.) दोन परीक्षांद्वारा करतात. पहिली अखिल भारतीय सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा - आय.ए.एस्., आय.पी.एस्., आय.एफ.एस् तसेच रेल्वेच्या वाणिज्य व परिवहन, वित्त, कार्मिक व रेल सुरक्षा बलाचे अधिका-यासाठी सुद्धा एकच असते. दुसरी टेक्निकल विभागासाठी ‘इंजिनियरींग सेवा परीक्षा असते. अशा त-हेने जगातील दुस-या नंबरची ही सरकारी रेल्वे सक्षम प्रशासकीय अधिकारी वर्ग चालवितो जो सामान्य नागरिकासाठी पडद्याआड़ असतो. - डॉ. केतन कमलाकर गोखले महाराष्ट्र वन विभाग - | महाराष्ट्राच्या वन विभागाला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. महाराष्ट्र राज्य १९६० साली अस्तित्वात आले. परंतु त्यापूर्वी मुंबई प्रांताचा तो एक भाग होता आणि ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश राजवटीत, भारताचा पहिला वन अधिकारी, १८४६ साली पुण्यात नेमला गेला आणि देशाच्या वन व्यवस्थापनाला सुरुवात झाली. डॉ. गिबसन हे पुणे जिल्ह्यांत देशातले पहिले ‘वनसंरक्षक म्हणून नेमले गेले. त्यांनी तयार केलेली देशातली पहिली वनकार्य योजना पण महाराष्ट्रातच बनली. ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रेसिडेन्सी हीपण कारवारपासून उत्तर-पश्चिमेकडे सिंध कराचीपर्यंत पसरलेली होती. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'बॉम्बे स्टेट' बनले. महाराष्ट्र राज्याची वनसंपदा विविधतेने भरलेली आहे. कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांग, अवर्षणप्रवण पठार, खानदेश आणि १६६ शिल्पकार चरित्रकोश