पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बोलताना म्हणाले होते, “तुम्ही यश मिळवलेत तर त्याचे कौतुक कुणी करणार नाही; तुमच्या अपयशाचा मात्र डांगोरा पिटला जाईल. तुमच्या यशस्वी कामांचा उल्लेख तुम्ही कुणाहीकडे करू शकत नाही. तुमची अयशस्वी कामे मात्र स्वत:च सगळ्यांना स्वत:ची माहिती ओरडून सांगत असतात. गुप्तवार्ता खात्याला अपयश आले की प्रसारमाध्यमे आणि सामान्य जनतासुद्धा गुप्तवार्ता खात्याच्या नावाने शंख करते, बिचा-या गुप्तवार्ता खात्याला आपल्या अपयशाची कारणे लोकांसमोर खुलेपणाने मांडताही येत नाहीत. गुप्तवार्ता खात्याचे काम कसे चालते याची काहीही माहिती नसताना त्याच्यावर टीका करणे किंवा अतिरेकी हल्ल्यानंतर दरवेळी, हे गुप्तवार्ता खात्याचेच अपयश आहे, असा गदारोळ करणे फार चुकीचे आहे. इतिहास : इंटेलिजन्स ब्यूरो उर्फ आय. बी. च्या पुर्वेतिहासाला मानहानिकारक म्हणायचे की गौरवशाली म्हणायचे, हे आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. भारतात 'ठग' या नावाने ओळखल्या जाणा-या लुटारू व खुनी लोकांनी भयानक धूमाकूळ घातला होता. त्यांचा बिमोड करण्यासाठी इंग्रजांनी १८३५ मध्ये ‘ठगी अँड डकैती डिपार्टमेंट -टी अँड डी- या नावाचे खाते सुरु केले. या खात्याने ठगांचा साफ नायनाट केला, हे गौरवस्पदच आहे. पण मुळात चोर-दरोडेखोरांचा बंदोबस्त हे काही हे गुप्तवार्ता संकलनाचे काम नव्हे. १८८५ मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन त्यांच्या राजकीय हालचाली वाढू लागली. इंग्रजांनी टी अँड डी ला त्या कामाला लावले. १९२० साली टी अँड डी हे नाव जाऊन अधिकृतपणे आय. बी. हे नाव सुरु करण्यात आले. संपूर्ण देशाच्या अंतर्गत गुप्तवार्ता संकलनाचे काम आय. बी. कडे सोपवण्यात आले. १९६२ मध्ये चीनने भारतावर लष्करी आक्रमण करून भारताचा पराभव केला. यातून सगळ्याच सुरक्षा दलांची पुनर्रचना होऊन १९६८ मध्ये 'रिसर्च अँड अॅनालिसिस विंग'- रॉ ची स्थापना झाली व परराष्ट्रीय गुप्तवार्ता संकलनाचे काम रॉ कडे सोपवण्यात आले. आय. बी. चा वापर इंग्रज सरकारने राजकीय नेत्यांवर नजर ठेवण्यासाठी केला होता. स्वातंत्र्यानंतरही तेच कार्य चालू राहिल्याबद्दल वेळोवेळी टीका झाली, चर्चा झाली, उपाय सुचवले गेले; पण कोणत्याही सरकारने त्यात मनापासून लक्ष घातले नाही. १९७५ च्या आणीबाणीनंतर न्यायमूर्ती शहा आयोग व एल. पी. सिंग समिती यांनी आय. बी. ची कार्यपद्धती व कार्यकक्षा यांबाबत अतिशय मौल्यवान सूचना केल्या होत्या. पण त्या कार्यवाहीत कधीच आणल्या गेल्या नाहीत. आय. बी. ची सर्वव्यापी हेरगिरी चालूच राहिली. भारत सरकारला महत्वाच्या वाटणा-या राष्ट्रीय जीवनातील सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी व शांतता आणि सुरक्षा यांना धोका निर्माण करू शकणाच्या घटना यांचे निरीक्षण करण्याचे तिचे काम चालूच राहिले. (संदर्भ - पोलिटिकल व्हायलन्स अँड दि पोलीस इन इंडिया - लेखक : के. एस. सुब्रमणियन) आव्हाने : फुटीरता आणि आतंकवाद यांच्या विरोधात खंबीरपणे उभा असणारा देशाचा बुलंद बुरूज म्हणजे गुप्तवार्ता खाते होय. जेव्हा परिस्थिती हिंसक वळण घेते, तेव्हा सशस्त्र दले मैदानात उतरतात. पण अतिरेकी हल्ले आणि फुटीर कारवाया यांचे जे भूमिगत कार्य सुरू असते त्याची पूर्वसूचना प्राप्त करणे व त्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करणे, हे गुप्तवार्ता खात्याचे काम आहे. वर्तमान परिस्थितीत गुप्तवार्ता खात्यांची सर्वाधिक महत्त्वपूर्ण जबाबदारी खालील क्षेत्रांत आहे - १. फुटीर कारवायांचा बंदोबस्त, २, अतिरेकी, माओवादी, नक्षलवादी बंडखोरांचा बिमोड, ३. अंमली पदार्थ तस्करी व बनावट चलन रोखणे, ४. भ्रष्टाचार रोखणे. | अंमली पदार्थांची तस्करी व बनावट चलनाचा प्रसार रोखण्यासाठी पूर्वीपासूनच खास गट नियुक्त करण्यात आलेले आहेत. पण आता उजेडात आलेल्या काही घटनांमधून असे स्पष्ट झाले आहे की, अंमली पदार्थ शिल्पकार चरित्रकोश १६५