पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। प्रशासनातील काही महत्त्वाचे विभाग गुप्तवार्ता - एक जागरूक प्रहरी | देशाची सुरक्षितता आणि सार्वभौमत्व अढळ राहावे याकरिता गुप्तवार्ता फार महत्त्वाच्या असतात हे भारतीय राज्यकर्त्यांना ज्ञात होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात गुप्तवार्ता हा विषय इतक्या तपशीलात वर्णन करण्यात आला आहे की, जणू ते त्याच विषयावरचे पुस्तक आहे असे वाटावे. मात्र अलीकडच्या राज्यकर्त्यांनी या महत्त्वपूर्ण विषयाकडे अनेकदा दुर्लक्ष केलेले आढळते. छत्रपती शिवरायांसारख्या जाणत्या राजाने आपल्या प्रबळ शत्रूला नामोहरम करण्यासाठी गुप्तवार्ताचा प्रभावी वापर केलेलाही आढळतो. परंतु या गुप्तवार्ता संकलनाला एका शिस्तबद्ध संघटनेचे रूप मिळाले ते मात्र ब्रिटीश राज्यात. गुप्तवार्ता संस्थांची रचना: आज भारतात विविध क्षेत्रातल्या गुप्तवार्ता संकलनाची वेगवेगळी खाती आहेत. त्यांची माहिती सोप्या भाषेत मांडणे थोडे किचकटच काम आहे; पण सामान्यतः या कामाचे दोन ठळक भाग आहेत. पहिला, अंतर्गत गुप्तवार्ता संकलन; आणि दुसरा, विदेशी गुप्तवार्ता संकलन, पहिले काम इंटेलिजन्स ब्युरो' उर्फ आय. बी. ही संस्था पाहते. ती केंद्रिय गृह मंत्रालयाच्या कक्षेत येते. तर दुसरे काम ‘रिसर्च अँड अॅनालिसिस विंग' उर्फ रॉ ही संस्था पहाते व ती केंद्रिय सचिवालयाच्या (कॅबिनेट सेक्रटारियट्) कक्षेत येते. शिवाय भूदल, वायुदल व नौदल यांची आपापली स्वतंत्र गुप्तवार्ता खाती आहेत. त्यांना ‘आर्मी इंटेलिजन्स', 'एअर इंटेलिजन्स' व नेव्हल इंटेलिजन्स' अशी नावे आहेत. खेरीज केंद्रिय अर्थ मंत्रालयाचेही स्वतंत्र गुप्तवार्ता खाते आहे आणि प्रत्येक राज्य सरकारच्या पोलीस दलांचीही गुप्तवार्ता खाती आहेत. त्यांना स्पेशल बँच' असे म्हटले जाते. ही सर्व खाती आपापल्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये कार्यरत असतात. आपल्याला कदाचित वाटेल की, इतकी गुप्तवार्ता खाती खरोखरच आवश्यक आहेत का? तर त्याचे उत्तर असे आहे की, जगभरच्या सगळ्याच देशांमध्ये ती तशी आहेत व हे अपरिहार्य आहे. सध्या तर असा विचार चालला आहे की, सीमा सुरक्षा दल, केंद्रिय रिझर्व पोलीस अशा निमलष्करी दलांना देखील त्यांच्या आपापल्या गुप्तवार्ता संकलन खात्याची जोड दिली जावी, अशी भरमसाठ गुप्तवार्ता खाती निर्माण केल्यामुळे गुप्तवार्ता संकलनाचा दर्जा सुधारतो का, हा खरा प्रश्न आहे. कारण विविध खात्यांकडून आलेल्या माहितीचा समन्वय करून त्याचा अचूक अन्वयार्थ लावणे, हे मोठे कठीण काम असते. त्यामुळे अशा विविध गुप्तवार्ता खात्यांच्या कार्याचे रास्त मूल्यांकन करून ते वाजवी खर्चात होत आहे ना, अनुत्पादक तर ठरत नाही ना, हे सर्वोच्च पातळीवर पडताळून पाहिले जायला हवे. मुंबईतल्या २६/११ च्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 'मल्टि एजन्सी कमिटी', नॅशनल इन्व्हेस्टिगेशन' असे काही गट निर्माण करून गुप्तवार्ता संस्थांमधील समन्वय, सुसूत्रता कार्यक्षम करणे; तसेच गुप्तवार्ता संस्थांना तंत्रज्ञान दृष्ट्या अद्ययावत बनवणे, इत्यादि कामे सुरू केली आहेत. कमालीचा बिनबोभाटपणा हे यशस्वी गुप्तवार्ता संकलनाचे सर्वात महत्त्वाचे सूत्र आहे. १९६१ मध्ये अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी हे सी. आय. ए. या गुप्तवार्ता खात्याच्या अधिका-यांचा बैठकित १६४ शिल्पकार चरित्रकोश