पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/१०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भगवती, नटवरलाल हरिलाल न्यायपालिका खंड हाला भगवती, नटवरलाल हरिलाल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ८ ऑगस्ट १८९४ नटवरलाल हरिलाल भगवती यांचा जन्म बडोदा येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण बडोदा महाविद्यालय आणि मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात झाले. १९१४मध्ये ते बी.ए.(ऑनर्स) उत्तीर्ण झाले आणि त्यांना ‘दक्षिणा फेलोशिप’ मिळाली. नंतर १९१६मध्ये ते एलएल.बी. व १९१७मध्ये एम.ए. या परीक्षा उत्तीर्ण झाले. १९२१मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली सुरू केली. १९२९ ते १९३१ या काळात ते मुंबईच्या शासकीय विधि महाविद्यालयात प्राध्यापक होते. मुंबई विद्यापीठ अधिसभा आणि सिंडिकेटचे ते अनुक्रमे १९४७ आणि १९४८मध्ये सदस्य होते. १९४९मध्ये कायदा शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या ‘बॉम्बे लीगल एज्युकेशन रिफॉर्म कमिटी’मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. नोव्हेंबर १९४९ ते नोव्हेंबर १९५१ या काळात ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. १९४९मध्ये मुंबई विद्यापीठ पुनर्रचना समितीचे ते अध्यक्ष होते. ऑगस्ट १९४४मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. नंतर सप्टेंबर१९५२मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयावर जाणारे ते पहिले न्यायाधीश होत. १९५९मध्ये निवृत्त झाल्यानंतर काही काळ ते बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांचे चिरंजीव प्रफुल्लचंद्र तथा पी.एन.भगवती पुढे १९८५मध्ये भारताचे सरन्यायाधीश झाले. - शरच्चंद्र पानसे

भरुचा, सॅम पिरोज भारताचे सरन्यायाधीश ६ मे १९३७ सॅम पिरोज भरुचा यांचा जन्म मुंबईला झाला. त्यांचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. बी. एस्सी. व एलएल.बी. या पदव्या संपादन केल्यावर ते २८ जुलै १९६० पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत व नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली करू लागले. १९सप्टेंबर१९७७ रोजी त्यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली. ३एप्रिल१९७८ रोजी ते उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश झाले. १नोव्हेंबर१९९७ रोजी त्यांची नियुक्ती कर्नाटक उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून झाली. १जुलै१९९२ रोजी न्या.भरुचा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून झाली. १नोव्हेंबर२००१ रोजी ते भारताचे सरन्यायाधीश झाले. ५मे२००२ रोजी ते निवृत्त झाले. - शरच्चंद्र पानसे

१०० शिल्पकार चरित्रकोश