पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला.pdf/८१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दृश्यकला खंड


माणिक वालावलकर, बी. एफ. ए., सर ज. जी. कलामहाविद्यालय, मुंबई, एम. एफ. ए. जे. जे.स्कूल ऑफ आर्ट, मुंबई. दृश्यकला विषयक लिखाण प्रसिद्ध 'भारतीय चित्रकला की कहानी' हे पुस्तक २००७ साली प्रकाशित. २००५ पासून मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट, दादर या कलामहाविद्यालयात कला अध्यापक म्हणून कार्यरत.


विठ्ठल नारायण शानभाग, जी. डी. आर्ट (चित्रकला, शिल्पकला) आर्ट मास्टर. ६ पूर्णाकृती, २२ अर्ध स्मारकशिल्प, २५ उत्थित शिल्पे व अनेक स्मृतिचिन्हे बनविली आहेत. मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथे समूह प्रदर्शने झाली असून चित्र-शिल्प-कलाविषयक लेखन करतात. शिल्पकला विभागाचे विभाग प्रमुख म्हणून जे. जे. स्कूल आर्टमधून निवृत्त झाले.


मेधा सत्पाळकर, बी. एफ.ए. (पेंटिंग). यांनी प्रिंट मेकिंग या विषयात कनोरिया सेंटर व ग्लासगो स्टुडिओ - युके येथे प्रिंट मेकिंग व पेपर मेकिंग या विषयात काम केले. त्यांना भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाची ज्युनिअर फेलोशीप मिळाली. अनेक पारितोषिके व देश-परदेशात प्रदर्शने. यांच्या कलाकृती फ्रेंच, बिएनाले व कोलोराडो म्युझिअममध्ये प्रदर्शित.


प्रफुल्ल भीमराज सावंत, जी. डी. आर्ट, डिप्लोमा इन आर्ट एज्यु. दर्जेदार व्यक्तिचित्रे व निसर्गचित्रे काढणारे कलावंत सन २००० पासून अमेरिका, जर्मनी, इस्तंबूल येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत, तसेच भारतातील प्रदर्शनात पारितोषिके मिळाली. अनेक एकल व समूह प्रदर्शने झाली असून 'नाशिक कला निकेतन' या संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.


रंजना सुतार, पुणे विद्यापीठातून बी.कॉम व बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स, पुणे विद्यापीठ. सध्या अभिनव कलामहाविद्यालय, पुणे येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. विविध वृत्तपत्रांतून व मासिकातून कलाविषयक लेखन करत असून कलाकृतींच्या जतनासंदर्भात काम करतात. कामायनी विद्यामंदिर, पुणे यांच्यातर्फे 'आदर्श पालक पुरस्कार'.


अरविंद हाटे, जी.डी. आर्ट (१९७७) राज्य कला प्रदर्शन व बॉम्बे आर्ट सोसायटीचे शताब्दी प्रदर्शनात पारितोषिक प्राप्त. ठाणे, मुंबई, दिल्ली येथे १५ समूह प्रदर्शने. विविध औद्योगिक कंपन्यांसाठी प्रदर्शनांचे डिझाईनिंग व प्रकाशन पुस्तिकाचे काम केले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन.


लखीचंद जैन, जी. डी. आर्ट (उपयोजित कला.) सध्या इंटरअॅक्टीव मीडिया आणि म्युझीयम स्पेस डिझाइन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी लुप्त होत चाललेल्या 'मांडणा' या पारंपरिक लोककलेला आधुनीक तंत्रज्ञानाची जोड देऊन हा कलाप्रकार देश-विदेशात लोकप्रिय केला. याबद्दल १९९६ मध्ये राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला.


शिल्पकार चरित्रकोश

७४९