पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ६ - दृश्यकला.pdf/८१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दृश्यकला खंड


संतोष मोरे, बी. एफ. ए. राज्य कला प्रदर्शन व बॉम्बे आर्ट सोसायटीची पारितोषिके, तसेच बेंद्रे-हुसेन स्कॉलरशिपने व हेब्बर फाऊंडेशनच्या शिष्यवृत्तीने सन्मानित झाले. देशात व परदेशात सात एकल व बारा समूह प्रदर्शने झाली. कलाविषयक लेखन केले असून छोट्या गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.


स्वाती राजवाडे, बी.ए., एम.ए. (आर्ट अँड पेंटिंग ) ( एस. एन. डी. टी. विद्यापीठ) पीएच.डी. व संगीत विशारद. अनेक एकल व समूह प्रदर्शने झाली आहेत. सध्या त्या नाशिक शहर संस्कार भारतीच्या अध्यक्षा असून अनेक वृत्तपत्रांतून व मासिकातून लेखन.


दिलीप रानडे, जी. डी. आर्ट (पेंटिंग) संग्रहालयशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ साली इंडो-यूएस सबकमिशनची शिष्यवृत्ती प्राप्त झाली. १९७२ ते २०११ या कालावधीतील त्यांची अनेक एकल व समूह प्रदर्शने झाली.


समीर राहाटे, एम.एफ.ए. (अप्लाईड आर्ट) त्यांनी इलस्ट्रेशन या विषयात जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून विशेष पदविका प्राप्त केली. ते सध्या सोफिया पॉलिटेक्निकमध्ये आर्ट अँड डिझाईन डिपार्टमेंटला ग्राफिक डिझाईन व इलस्ट्रेशन या विषयाचे व्याख्याता.


सुधाकर लवाटे, जी.डी. आर्ट (पेंटिंग), ए. एम. राज्य पुरस्कारासह अनेक पुरस्कार. मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर, हैद्राबाद अशा अनेक ठिकाणी त्यांची एकल व समूह प्रदर्शने झाली. सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे 'चित्रवेध' हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांनी केलेले दोन इंग्रजी कादंबऱ्यांचे भाषांतर प्रकाशित झाले आहे.


सुभाष वसेकर, एम.ए., जी. डी. आर्ट चित्रकला महाविद्यालयात नांदेड येथून प्राचार्य पदावरून निवृत्त. त्यांची ‘पऱ्यांची शाळा', 'परीचे अश्रू', 'समुद्रातील राज्यात राजू' आदी बालकविता व कथासंग्रह प्रसिद्ध असून 'पयांची शाळा' ला महाराष्ट्र राज्य पुरस्कार (२००४) मिळाला आहे. आंबेजोगाई येथे १९९७ साली भरलेल्या पाचव्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.


प्रतिभा वाघ, एम.ए. (इतिहास), आर्ट टीचर्स डिप्लोमा, जी. डी. आर्ट, आर्ट मास्टर. त्यांनी केंद्र सरकार तर्फे महाराष्ट्राच्या चित्रकथीच्या अभ्यासाकरिता फेलोशिप मिळाली. राजा दिनकर केळकर म्युझियम, पुणे यांच्याकरिता लेदर पपेट या कॅटलॉगसाठी संपादन आणि लेखन केले. दहा एकल चित्रकला प्रदर्शने व २६ समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता.


शिल्पकार चरित्रकोश

७४८