पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/५१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कृषी खंड बर्न येथे जागतिक टपाल संघटनेमध्ये संख्याशास्त्र विभागात दाखल झाले. इन्फर्मेशन सर्व्हिस इंटरनॅशनल ब्युरोमध्ये ते अधिकारी म्हणून रुजू झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असताना हाती येत चाललेल्या तिसऱ्या देशातील आकडेवारींनी जोशी अस्वस्थ होत गेले. तिसऱ्या देशाच्या दारिद्र्याचा प्रश्न कोरडवाहू शेतीत अडकला असल्याची त्यांची स्पष्ट धारणा झाली. त्यांनी या विषयावर अभ्यास करण्यासाठी भारतात परतायचे निश्चित केले. म्हणून ते १९७६ मध्ये पत्नी लीला, दोन मुली श्रेया व गौरी यांच्यासोबत भारतात परतले. त्यांनी पुणे जिल्ह्यात चाकणजवळ अंबेठाण या गावी २८ एकर कोरडवाहू शेती खरेदी करून आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. शेतकऱ्यांची शेती कायमच तोट्यात राहावी अशीच धोरणे शासनाकडून आखली जातात, असा निष्कर्ष त्यांनी या अभ्यासातून काढला. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघू नये इतके कमी भाव त्यांना जाणीवपूर्वक दिले जातात. शेतकरी आपला माल बाजारात घेऊन जातो तेव्हा वाहतूक, हमाली, दलाली, वजनकाटा, बाजार समितीचा खर्च, मुख्यमंत्री फंडाला दिलेले पैसे इतका खर्च वजा जाता शेतकऱ्यालाच खिशातून पैसे द्यायची वेळ येते. हे उलट पट्टीचे गणित आहे, हे जोशी यांच्या लक्षात आले. शेतमालाच्या अपुऱ्या किमती हेच शेतकऱ्याच्या दारिद्र्याचे मूळ कारण आहे आणि शेतकऱ्याचे दारिद्र्य हेच देशाचे दारिद्र्य आहे, अशा या मांडणीतूनच पुढे 'शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळालाच पाहिजे' हा एककलमी कार्यक्रम पुढे आला. जोशी यांनी सर्वप्रथम १६ फेब्रुवारी १९८० रोजी चाकण परिसरात कांद्यासाठी आंदोलन केले आणि या चळवळीला सुरुवात झाली. कांद्याचा चिघळलेला प्रश्न, देशाच्या कांद्यांच्या एकूण बाजारपेठेत चाकणचे स्थान शिल्पकार चरित्रकोश जोशी, शरद अनंत आणि आंदोलनाच्या दृष्टीने मुंबई - आग्रा मार्गावरची चाकणची जागा या सगळ्यांचा विचार करून योजनापूर्वक 'रस्ता रोको' आंदोलन पुकारण्यात आले. यानंतर जोशी यांनी निपाणी (कर्नाटक) चे तंबाखू आंदोलन, नाशिकचे उसाचे आंदोलन आणि मग विदर्भातील कापसाचे आंदोलनही यशस्वीपणे पूर्ण केले. ही सगळी आंदोलने शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने करण्यात आली. तरीही शासनाने शस्त्र वापरून आंदोलने दडपण्याचा प्रयत्न केला. त्यात शेतकऱ्यांचे नाहक बळी गेले. जोशी यांनी शेतकरी समाज हा मूलतः स्वतंत्रतावादी आहे, हे ओळखून संपूर्ण शेतकरी आंदोलनही त्या विचाराभोवतीच उभे केले. सटाणा येथे जानेवारी १९८२मध्ये संघटनेचे पहिले अधिवेशन भरले. त्यानंतर परभणी, धुळे येथेही अधिवेशने यशस्वी झाली. त्यात १९८६ मध्ये चांदवड येथे भरलेले शेतकरी महिला आघाडीचे अधिवेशन वैशिष्ट्यपूर्ण ठरले. या अधिवेशनात उपस्थित राहिलेल्या लाखो शेतकरी महिलांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली. शेतकरी संघटनेच्या विचारांच्या प्रसारासाठी ६ एप्रिल १९८३ रोजी 'शेतकरी संघटक' या पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य सुरेशचंद्र म्हात्रे यांच्या संपादनाखाली हे पाक्षिक यशस्वीपणे चालू आहे. जोशी यांचे सर्वच लिखाण या पाक्षिकातूनच प्रसिद्ध झाले आहे. दिल्लीच्या बोटक्लब मैदानावर १९८९ मध्ये एक मोठा शेतकरी मेळावा देशभरच्या शेतकरी संघटनांनी भरवून दाखवला. जोशी यांचे नेतृत्व तोपर्यंत देशपातळीवर स्थिरावले होते, पण उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे जाट नेते महेंद्रसिंग टिकैत यांनी जोशी यांना मंचावर धक्काबुक्की केली आणि हा मेळावा उधळला. तेव्हा जोशींना हृदयविकाराचा मोठा झटका आला व त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करावे लागले, पण देशभरच्या शेतकऱ्यांमध्ये जोशींच्या विचारांचा संदेश स्वच्छपणे पोहोचला होता. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली १९९० मध्ये स्थायी कृषी सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली होती. या १४१ ज