पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ५ - कृषी, पशुसंवर्धन.pdf/५१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

________________

ज जोशी, शरद अनंत कृषीखंड आकार यात वाढ झालेली अनुभवास आली आणि जमीन डोंगरात होती. तेथील चराऊ रानाचा उपयोग विक्रमी उत्पादन मिळाले. बाबूकाकांनी उसासारखी १२ ते १८ महिन्यांनी तयार होणारी बहुहंगामी पिकेही घेतली. त्यांनी बारमाही, भरपूर पाण्याचा पुरवठा, पुढील प्रक्रिया केल्याशिवाय जी पिके उत्पादक ठरत नाहीत, अशी ऊस व द्राक्षासारखी पिकेही उत्साहाने घेतली. तसेच त्यांनी उसाच्या रसापासून कच्ची साखर तयार करण्यासाठी हाताने चालणारी सेंट्रिफ्युगल यंत्रे करून घेतली व त्याद्वारे भुरा साखर तयार केली. वाहतुकीसाठी ती अधिक सोयीची होती व त्यास गुळापेक्षा अधिक किंमतही मिळे. मराठवाड्याची जमीन व हवापाणी कपाशी लागवडीस अनुकूल आहे. बाबूकाका यांनी जादा उत्पादन देणाऱ्या वाणाची (एन.एस.) निवड केली व त्या भागात सर्वोच्च उत्पादन मिळवण्याचा विक्रम केला. कपाशीची व सरकीची ते स्थानिक पातळीवर खरेदी करत व तेथून हैदराबाद - मुंबई यांसारख्या मोठ्या बाजारपेठेत पाठवत. सामान्य शेतकऱ्याला ते लागवडीसाठी कपाशीचे बी ( सरकी) उधारीवर पुरवत व उत्पन्न मिळाल्यावर कपाशी विकतही घेत. बाबूकाकांनी ज्वारी, बाजरी, गहू यांसारख्या हंगामी पिकांवर अवलंबून न राहता त्या भागात प्रचलित नसलेल्या मोसंबी, द्राक्ष व डाळिंब या तीन पिकांच्या बागा विकसित केल्या आणि त्यांच्या रोपवाटिकाही उभारून, स्थानिक लोकांना शुद्ध व सुदृढ रोपे उपलब्ध करून दिली. त्यांनी पानमळ्याचा चांगला सांभाळ करून किफायतशीर व्यवसाय केला. त्यांनी शेतीतील डोंगराळ भागात एरंडीचे उत्पादन घेतले. वामन जोशी यांनी १९७०- १९८० च्या दशकात होलस्टीन फ्रीझियन संकरित गाई, तसेच देवणी व गीर जातीच्या देशी गाई सांभाळल्या व डेअरी सुरू केली. त्यांनी दिल्लीच्या मुन्हा म्हशींचाही गोठा उभारला. त्यासाठी त्यांनी आरेच्या धर्तीवर गोठा पद्धत अवलंबली व गोठ्यातच जनावरांना चारापाणी देण्याची व्यवस्था केली. जनावरांच्या शेण व मूत्र यापासून शेतीस आवश्यक ते खतही मिळू लागले. त्यातून शेणखत व इंधन म्हणून गोबरगॅस मिळू लागला. देगाव येथील १४० त्यांनी बकरीपालनासाठी केला. वामन जोशी यांच्याजवळ १५०-२०० बकऱ्या होत्या. त्यापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळे व शेतीसाठी खतही मिळे. हरित खते मिळण्यासाठी ३० एकरात ते ताग लावत व नंतर तो जमिनीत गाडत. १९५५ च्या सुमारास शेतीत यंत्रांचा उपयोग करणे शक्य नव्हते. पुढे त्यांनी पहिला ट्रॅक्टर घेतला. शेतीची मशागत व वाहतुकीचे प्रमुख साधन म्हणून त्याचा उपयोग होऊ लागला. त्यांनी गोबरगॅससाठी यंत्रणा, गोमूत्र जमा करणे व कीटकनाशक म्हणून त्याची फवारणी करणे यासाठी यंत्रणा उभारली. त्याचबरोबर मळणीयंत्र, क्रशर, शेंगा फोडण्याचे यंत्र ही यंत्रसामग्रीही उपयोगात आणली. त्यांनी शेतीशी प्रत्यक्ष संबंधित नसणारेही उद्योग हाती घेतले. पिठाची गिरणी, कापड व्यवसाय, सॉ मिल, चुनाभट्टी, वीटभट्टी यांसारखे उद्योग यशस्वीरीत्या उभारले व चालवले. ते स्थानिक सहकारी संस्थेचे वीस वर्षे अध्यक्ष होते. तसेच गावचेही अनेक वर्षे सरपंच होते. त्यांनी बलोपासनेला खूप महत्त्व दिले. त्यांनी व्यायामशाळा उभारली. त्यांचे सहकारी सखाराम पाटील व सुरेंद्र भंडारी यांच्या सहकार्याने त्यांनी दारूबंदीचे कार्यही चालवले. स्थानिक पातळीवर त्यांनी होमगार्ड पथकही उभारले. ते काँग्रेसचे आयुष्यभर कार्यकर्ते होते. शेवटची तीन वर्षे त्यांनी मौनव्रत धरले. वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी त्यांनी हा इहलोक सोडला. जोशी, शरद अनंत शेतकरी संघटनेचे प्रणेता ३ सप्टेंबर १९३५ डॉ. निळकंठ गंगाधर बापट शरद अनंत जोशी यांचा जन्म सातारा येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांनी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयातून पूर्ण केला. पुढे लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते भारतीय टपाल सेवेत रुजू झाले. ते १९६८ मध्ये स्वित्झर्लंडची राजधानी शिल्पकार चरित्रकोश