पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महात्मा गांधी मिशन शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाचा यशस्वी प्रकल्प महात्मा गांधी मिशन हे नाव आता महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना अभिमानाचे नाव झाले 1 आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाण्याचे मोठे काम या संस्थेने आधुनिक महाराष्ट्रात केले आहे. नांदेड तालुक्यातील लिंबगाव या छोट्या गावात कमलकिशोर कदम या द्रष्ट्या व्यक्तीच्या मनात महात्मा गांधींच्या विचारांच्या प्रेरणेने एक स्वप्न तरळलं. या देशातल्या सामान्य माणसाला रोजगार मिळवून देणारं तंत्रशिक्षण, उच्चशिक्षण आपल्या भागात उपलब्ध असलं पाहिजे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच कला, सांस्कृतिक, क्रिडा आदी क्षेत्रातही आपले कौशल्य विकसित करून देशासाठी चमकदार कामगिरी करण्याची संधी मुलांना उपलब्ध झाली पाहिजे. त्यासाठी १९८२ साली त्यांनी नांदेड येथे महात्मा गांधी मिशन या संस्थेची स्थापना केली. त्यावेळी लावलेल्या रोपाचा आज महावृक्ष झाला आहे. संस्थेचे चेअरमन कमलकिशोर कदम, सचिव अंकुशकुमार कदम आणि अन्य सर्व विश्वस्तांच्या परिश्रमातून आज नांदेड, परभणी, औरंगाबाद, नवी मुंबई आणि नोएडा अशा ठिकाणी संस्थेचा मोठा विस्तार झाला असून सर्व ठिकाणी अनेक महत्त्वाचे अभ्यासक्रम सर्वांसाठी खुले आहेत. केजी ते पीजी म्हणजे प्राथमिक पूर्व शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाची सोय महात्मा गांधी मिशनने आपल्या संकुलामध्ये उपलब्ध करून दिली आहे. अभियांत्रिकी, बायोसायन्स, व्यवस्थापनशास्त्र, वैद्यकीय शिक्षण या शाखाअंतर्गत येणारे विविध अभ्यासक्रम औरंगाबाद, नांदेड, नवी मुंबई, नोएडा या ठिकाणी चालतात. या शिवाय शिक्षणशास्त्र, फाईन आर्ट, व्होकेशनल कोर्सेस, पॅरा मेडिकल, एलएल.बी.चा अभ्यासक्रम, पत्रकारिता व संज्ञापन अभ्यासक्रम, दंतवैद्यकीय पदवी अभ्यासक्रम, बीएससी नर्सिंग पदविका, कृषी जैवतंत्रज्ञानातील विषयांचे अभ्यासक्रमही औरंगाबाद, नांदेड, नवी मुंबई या ठिकाणी चालतात. वैद्यकीय शिक्षण विषयात एमजीएमचे अभिमत विद्यापीठच स्थापन झालेले आहे. यासाठी एमजीएम मेडिकल कॉलेज, एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरेपी, एमजीएम स्कूल ऑफ बायोमेडिकल सायन्सेस, एमजीएम न्यू बॉम्बे कॉलेज ऑफ नर्सिंग या नावाने नवी मुंबई व औरंगाबाद या ठिकाणी सुसज्ज इमारती, कुशल व तज्ज्ञ अध्यापकवर्ग, संशोधनाच्या सर्व सुविधा, अभ्यासाशिवाय कला, क्रिडा, अभिनय, लेखन अशा सर्व गुणांना वाव देणारे उपक्रम सतत चालू असतात. नृत्याच्या क्षेत्रात प्रशिक्षण देणारी महागामी ही संस्था औरंगाबाद येथे कार्यरत आहे. याशिवाय विपश्यना, निसर्गोपचार यासंदर्भातही उपक्रम चालविले जातात. टेक्सास विद्यापीठाच्या सहकार्याने एडस् संशोधन केंद्र, आयआयटी मुंबईसह दूरशिक्षणाचे उपक्रम, इंडो जर्मन टूलरूमशी करारामुळे विद्यार्थ्यांना अद्यायावत यंत्रनिर्मिती व सॉफ्टवेअर विकासाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी, अशा अनेक क्षेत्रात संस्थेने वरचेवर नवे नवे करार करून शिक्षणाबाबत जगासोबत आपले विद्यार्थी अद्ययावत ज्ञान संपादन करत राहिले पाहिजेत असा प्रयत्न चालविला आहे. या सर्व वाटचालीत उत्कृष्टता आणि गुणवत्तेला सतत महत्त्व दिल्यामुळे गुणवत्तेचे आयएसओ ९००१-२००० प्रमाणपत्र, महागामीला युनेस्कोचे सभासदत्व, सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना नॅकची मान्यता असे यश मिळाले आहे. एमजीएम ही आता केवळ एक संस्था नसून शिक्षणाचे सर्व पैलू समाजासमोर घेऊन जाणारी, जीवनात उभे करणारे व्यावसायिक उच्च शिक्षण उपलब्ध करणारी, शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाची एक परिणामकारक चळवळ बनली आहे. अधिक माहितीकरिता संपर्क :- एमजीएम, एन-६, सिडको, औरंगाबाद ४३१००३. दूरध्वनी: ९१/०२४०-६६०११००, २४८४६९३ फॅक्स: ९१/०२४०-२४८४४४५, website:- www.themgmgroup.com, E mail:- mgmadmn@themgmgroup.com ६ / विज्ञान व तंत्रज्ञान खंड शिल्पकार चरित्रकोश