पान:शिल्पकार चरित्रकोश खंड ३ – विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निर्माण ग्रुप ऑफ कंपनीज "To be among the top 5 builder-developers in India, and among the top 25 in the world while being the leader in the affordable housing segment by creating better lifestyles and better environments through state of the art townships at affordable rates." हे ब्रीदवाक्य घेऊ आज निर्माणची वाटचाल सुरू आहे. १९९५ साली अजित मराठे आणि राजेंद्र सावंत या दोन युवकांनी भागीदारीत सुरू केलेल्या ह्या फर्मचे रूपांतर आता निर्माण रिअल्टर्स अॅण्ड डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीत झाले आहे. येत्या २ ते ३ वर्षांत या कंपनीचा पब्लिक इश्यू बाजारात येणार आहे. अनेक कंपन्यांचा हा निर्माण ग्रुप विविध क्षेत्रांत यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. सतीश गानू हे ग्रुपचे संचालक असून मुख्यत्वे बॅडिंग अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजी या महत्त्वाच्या खात्यांची धुरा ते समर्थपणे सांभाळीत आहेत. निर्माण रिअल्टर्स अॅन्ड डेव्हलपर्स लि. मुख्यत: बिल्डर-डेव्हलपर म्हणून विविध ठिकाणी जागा विकत घेऊन तेथे विविध प्रकारचे प्रकल्प, मुख्यत: निवासी प्रकल्प उभे करते. असे ४५ प्रकल्प विविध ठिकाणी सुरू आहेत. कांदिवली, मालाड, जोगेश्वारी, महालक्ष्मी, पार्ले, मुलुंड, गोवंडी, नेरळ, रत्नागिरी, गणपतीपुळे, माणगाव (गोरेगाव), गोवेले, चिपळूण या ठिकाणी प्रकल्पांचे काम सुरू आहे. झोपडपट्टी पुनर्विकास, जुन्या चाळींचे पुनर्वसन, बंगलो स्कीम, सेकंड होम प्रोजेक्टस अशा विविध प्रकारांत हे प्रकल्प येतात. यांतील ९०% प्रकल्प हे अफोर्डेबल हाउसिंग या प्रकारात मोडतात. यातील महालक्ष्मीचा प्रोजेक्ट मात्र क्लास हाउसिंग या प्रकारात गणला जातो. मुंबईच्या रेसकोर्ससमोर तसेच महालक्ष्मी स्टेशनजवळ २०३ भाडेकरूंच्या पुनर्वसनाचा हा प्रकल्प आहे, ज्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होत आहे. टाटांचा राष्ट्रउभारणी कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्माण ग्रुप कार्यरत आहे. बांधकाम क्षेत्रात खऱ्या अर्थाने निर्माण ग्रुपचे नाव झाले ते नेरळ येथील सेकंड होम प्रोजेक्टमुळे. या प्रकल्पाला २००८ चे बेस्ट सेकंड होम्स प्रोजेक्ट हे ऑकोमोडेशन टाईम्सचे ॲवॉर्ड मिळाले. या प्रकल्पा अंतर्गत नेरळ येथे 'निर्माण नगरी', 'निसर्ग निर्माण' तसेच 'माथेरान व्हॅली' हे प्रकल्प दिमाखात उभे आहेत. आर्थिक मंदीच्या काळात देखील निर्माण ग्रुपने सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा चार ते साडे चार लाख रुपये किंमतीच्या घरांचा 'निर्माण नॅनो सिटी' हा प्रकल्प हाती घेऊन यशस्वी करून दाखविला व बांधकाम क्षेत्रांत निर्माण नॅनो सिटी' प्रकल्पामुळे सेकंड होम प्रोजेक्टची संकल्पना रूढ झाली. 'बिल्डरच्या हाताखाली बिल्डर' ही संकल्पना निर्माणने उत्तमरित्या राबवन अधिकाधिक मराठी लोकांनी बांधकाम व्यवसायात यावे यासाठी निर्माण ट्रेनिंग अँकेडमी' प्रयत्न करते. व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी 'निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना झाली. घराच्या प्रत्येक बुकिंगमागे रु.५०००/- हे ट्रस्टकडे जमा होतात. यातून माणगावचे १०० विद्यार्थी व मुंबईतील काही अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहेत. कोकणातील उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या सहयोगाने माणगाव (जि. रायगड) येथे आय.टी.आय.च्या केंद्रात पर्यटन, संगणक, इंग्रजी संभाषण, कृषीविषयक नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. 'निर्माण' व मा. द. मा. सुकथनकर यांच्या प्रेरणेने काही कोकणप्रेमी युवकांनी एकत्र येऊन सेव्ह कोकण लॅण्ड लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आहे. व्यवसायाभिमुख शिक्षणप्रणालीला चालना मिळावी या उद्देशाने निर्माण ग्रुप विविध उपक्रम राबविण्याकरिता प्रयत्न करीत असल्याचे संचालक सतीश गानू यांनी सांगितले. याच सामाजिक दृष्टिकोनातून 'आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश' या प्रकल्पास 'निर्माण' सहकार्य करीत आहे. शिल्पकार चरित्रकोश विज्ञान व तंत्रज्ञान खंड / ५