पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/७७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य खंड
सहस्रबुद्धे, पुरुषोतम गणेश
 

वैचारिक साहित्याविषयीची भूमिका आणि ललित साहित्याविषयीच्या कल्पना, यांत फारसा फरक नव्हता. त्यांचे संतवाङ्मयविवेचन समतोल होते; पण समाजावर विशेषतः राष्ट्रावर त्याचा अपेक्षित परिणाम होत नाही हे त्यांनी मांडले.
 स्वभावलेखनविषयक प्रबंधात त्यांची मते सापडतात, पण प्रामुख्याने बोधवादाचा पुरस्कारच आढळतो. वाङ्मयीन महानतेविषयीचे मर्ढेकर त्यांना धक्का देणारे होते. आत्मविष्काराचा विचार करताना केशवसुतांचा 'नेमका आत्मा' कोणता, हा प्रश्न त्यांना पडे. 'औदुंबर' मधले बालकवींचे व्यक्तिमत्व व कवितेचे श्रेष्ठत्व त्यांना समजणे अवघड जाई, तर गंगाधर गाडगिळांचे दुर्बोधतेचे समर्थन त्यांना अक्षम्य गुन्ह्यासारखे वाटे. त्यांनी विविध टीकाकारांचा अभ्यास करून साहित्यिकांच्या व्यक्तिमत्व, अनुभव, आत्माविष्कार यांवर मते मांडली आहेत. साहित्याचे कार्य, प्रयोजन, स्वरूप यांचाही त्यांनी विचार मांडलेला आहे. त्यांनी बोरकर, तांबे, माधव जूलियन शिकवले; पण एकंदरीत कवितेचे अंग त्यांना नव्हते, हेच लक्षात येते. काही वर्षे त्यांनी मॅट्रिक स्तरावर मराठी गद्य- पद्याविषयी मार्गदर्शिकांचेही लेखन केले. ग्रंथांना गुरू मानणारे डॉक्टर ग्रंथरचनेची तुलना राष्ट्ररचनेशी करत. ग्रंथ नष्ट करणारा परमेश्वराची मूर्ती अशी बुद्धी नष्ट करतो, असे ते मानत व ग्रंथरचना करणाऱ्याला परमेश्वराच मूर्ती व्यक्तीच्या चित्रात स्थापन करणारा मानत.
 त्यांचा भर नेहमीच राष्ट्रवादावर असे. ते त्यास प्रागतिक शक्ती मानत. त्यांना संघटित समाजजीवनाचे अधिष्ठान वाटे. राष्ट्राचा गौरव करताना राष्ट्रशत्रूंचा द्वेषही ते आवश्यक मानत. राष्ट्रवाद विचारात राष्ट्र घडवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना महत्त्वाची वाटे. मार्क्सवाद, समाजवाद, गांधीवाद यांचा विचार करून, दंडशक्तीचा अभ्यास करून ते आव्हान स्वीकारत. डॉक्टरांनी सतत लोकशक्ती आणि लोकसत्तेचाच पुरस्कार केला. टिळक आणि महात्माजींच्या कार्याचे लक्षणीय विश्लेषण केले. लोकशाहीला तारक आणि मारक प्रवृत्तींचा विचार करून समतोल विवेचन केले.
 रंगसत्तेची यशस्विता संशयास्पद वाटल्याने लोकसत्ता- लोकशाहीविषयक विचार ते अधिक गांभीर्याने करतात. गांधीवाद आणि साम्यवाद यांविषयीचे वैयर्थ्य व धोके सांगताना या विचारप्रणाली त्यांना पटत नसल्याचे जाणवते. या सर्व राजकीय, सामाजिक लेखनामागे देशहिताची तळमळ आणि विद्यार्थी- तरुणांना कार्यप्रवण करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट आहे. राष्ट्रनिष्ठेबरोबरच त्यांनी समाजावर व्यक्तिस्वातंत्र्य आणि बुद्धिवादाचे संस्कार


शिल्पकार चरित्रकोश
६२९