पान:शिल्पकार चरित्रकोश खंड २ – साहित्य.pdf/७७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साठे, अण्णाभाऊ तुकाराम
साहित्य खंड
 

केले. बहुजन समाजासही याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख या नात्यानेही त्यांनी अनेक ठिकाणी व्याख्याने दिली. १९४६ ते १९५३ या काळात सर परशुरामभाऊ महाविद्यालयात त्यांनी प्रतिवर्षी चोवीस व्याख्याने दिली. वर उल्लेख आलेल्या विषयांप्रमाणेच रशिया-चीन आणि अमेरिका-इंग्लंड ह्यांच्या लोकसत्तेवरही ते लिहीत/बोलत. तसेच मराठी कादंबरी, ह. ना. आपटे, संतसाहित्य यांवरही ते भाष्य करत. सावकारांपासून विल ड्यूरांटपर्यंत आणि मार्क्सवादापासून ते बांगलादेशाच्या मुक्तिवाहिनीपर्यंत, विविध विषयांवर ते विवेचन करत होते. आफ्रिकन नवोदित राष्ट्रांच्या माहितीपर अठ्ठावीस लेखांबरोबरच त्यांनी शेवटी १९७९ मध्ये जगाच्या प्रगतीविषयीही पाच लेखांक लिहिले आहेत.
 निबंधरचनाकार म्हणून गौरवल्या गेलेल्या डॉक्टरांच्या राजकीय-सामाजिक विचारांची झेप जशी मोठी होती, तशीच त्यांची साहित्यनिष्ठा, विज्ञान- विवेकनिष्ठा ही तितकीच जबर होती. ज्ञानकोशकारांची परंपरा लाभलेले डॉक्टर पु. ग. सहस्रबुद्धे सर्वार्थाने ऐश्वर्याच्या राजविद्येचे जाणते प्राध्यापक होते.

जयंत वष्ट

संदर्भ :
१. सहस्रबुद्धे, पु. ग.; 'षष्ट्यब्दी गौरवग्रंथ'.
२. सहस्रबुद्धे व. ग.; 'डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे चरित्र'.

साठे, अण्णाभाऊ तुकाराम
कथाकार, कादंबरीकार
१ ऑगस्ट १९२० - १८ जुलै १९६९
 अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या मांग (मातंग) समाजात झाला. त्यांनी बालपणापासूनच अस्पृश्यतेचे चटके सोसले. त्यांची शाळा दीड दिवसातच सुटली. वडिलांबरोबर वाटेगाव सोडून ते मुंबईत आले. ओझेवाला, हमाल, नाका कामगार, मिल कामगार अशा वेगवेगळ्या कामांतून त्यांनी अर्थार्जन केले आणि मुंबईतील दुकानाच्या पाट्या त्यांना वाचता-वाचता त्यांना अक्षरज्ञान झाले.

 १९४२ च्या आंदोलनात नाना पाटलांच्या प्रतिसरकारात त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यामुळे त्यांना भूमिगत व्हावे लागले. १९४४ साली टिटवाळा येथे लाल बावटा पथकाची स्थापना झाली. त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर सहभागी झाले होते.
 १९४९ साली 'मशाल' साप्ताहिकात 'माझी दिवाळी' ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. लेखक म्हणून अण्णाभाऊ साठेंची ही पहिली कलाकृती प्रकाशित झाली. पुढील काळात 'बरबांधा', 'कंजारी', 'चिरानगराची भुतं, 'निखारा', 'नवती', 'पिसाळलेला माणूस', 'आबी', 'फरारी', 'भानामती', 'साडी', 'कृष्णाकाठच्या कथा', 'खुळंवाडी', 'गजाआड', 'गुऱ्हाळ' इत्यादी १३ कथासंग्रह प्रकाशित झाले. तर 'इनामदार', 'पेंग्याचे लगीन', 'सुलतान', 'अकलेची गोष्ट', 'खापऱ्या', 'चोर', 'कलंत्री', 'बिलंदर बुडवे', 'बेकायदेशीर', 'शंरजीचे इलेक्शन', 'पुढारी मिळाला', 'मूक मिरवणूक', 'माझी मुंबई', 'देशभक्त घोटाळे', 'दुष्काळात तेरावा', 'निवडणुकीतील घोटाळे', 'लोकमंत्र्याचा दौरा', इत्यादी तमाशे व नाटके लिहिली. 'माझा रशियाचा प्रवास' हे त्यांचे प्रवासवर्णनही प्रसिद्ध आहे.
 अण्णाभाऊ साठेंच्या एकूण पस्तीस कादंबऱ्या प्रकाशित असून त्यांमध्ये 'आग', 'आघात', 'अहंकार', 'अग्निदिव्य', 'कुरूप', 'चित्रा', 'फुलपाखरू', 'वारणेच्या खोऱ्यात', 'रत्ना', 'रानबोका', 'संघर्ष', 'तास', 'गुलाम', 'डोळे मोडीत राधा चाले', 'ठासलेल्या बंदुका', 'जिवंत काडतूस', 'चंदन', 'मूर्ती', 'मंगला', 'मथुरा', 'मास्तर', 'चिखलातील कमळ', 'अलगूज', 'रानगंगा', 'माकडीचा माळ', 'केवड्याचे कणीस',


६३०
शिल्पकार चरित्रकोश