पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
(८४)

नांचा अंमल मनावर असतां कामा नये; त्या दाबांत ठेविल्या पाहिजेत.
 (३) योग्य शब्दांचाहि भरणा पाहिजेच, कारण निर्णय ही व्यापार दृश्य करण्याचे कामी शब्दच लागतात.

 निर्णयशक्तीची वाढः-मूल सरासरी एक वर्षांचे झाले म्हणजे ते ज्या वस्तु पाहात असते, त्यांची त्यास ओळख होते. अमुक एक पदार्थ अमुक आहे असे त्यास सांगता येत नसते, तरीपण हे सांगण्याकरितां मूल शक्य तेवढा यत्न करीत असते असे मात्र नेहमी आढळून येते. हम्मा, काऊ, माऊ, कुकू , बाऊ, हाय, यांसारखे शव्द मुळे उच्चारितात व तेणेकरून काहीएक विवक्षित पदार्थांची आपणांस ओळख झाली आहे असे दर्शवितात.
 यावरून असे दिसतें कीं, निर्णयशक्ति या काली थोडीबहुत असतेच. दुसरे वर्ष संपण्याचे सुमारास मूल वाक्य उच्चारूं लागतें. मूल प्रथम प्रथम जे निर्णय करूं लागते त्यांचा संबंध खाण्याचे व खेळण्याचे पदार्थांशी असतो. 'मम्मा वाईट आहे,' मना कको' ( मला नको), खाऊ चांगा (चांगला ) आहे, दे; अशासारखींच वाक्ये (निर्णय ) मुलांचे बोलण्यांत प्रथमा- रंभी येतात. जसजशी निरीक्षणशक्तीची वाढ होत जाते तसतशी निर्णयशक्तिहि वाढू लागते. पदार्थांची तुलना करण्याची शक्ति अंगी आली व शब्दांची चांगलीशी ओळख होऊन त्यांचा योग्य उपयोग करितां येऊ लागला म्हणजे निर्णयशक्तीचा बराच विकास झाला असे समजावें. तसेंच नकारयुक्त वाक्ये व काहीहि सांगतांना सावधगिरी असणे या गोष्टी निर्णयशक्तीचा विकास दर्शविणाऱ्या होत.
 निर्णयशक्ति सर्व माणसांचे ठिकाणी सारखी नसते. कांहीं कांहीं माणसे निर्णय करण्याचे कामी अगदी चटपट व उतावीळ असतात, तर काही मंद व संशयखोर असतात. हा फरक निरीक्षणशक्ति व स्मरणशक्ति यांतील फरकामुळे असतो. ज्या निर्णयांत कोणतीहि न्यूनता नसून संदिग्धताहि नसते, तोच निर्णय पुरा झाला असें