पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८५)

समजावें. अशिक्षित व लहान मुलांचे निर्णय बहुधा अस्पष्ट असतात. याची कारणे पुष्कळ आहेत. त्यांपैकीं येथे काही देतो:-(१)अपुरे निरीक्षण, (२) स्मरणशक्तीचा कच्चेपणा, (३) शब्द व त्यांनी दर्शित ज्या कल्पना यांच्यामध्ये मेळ नसणे, (४) बौद्धिक व्यापारांवर भावनांचा पगडा, ( याचे उदाहरण, मुलें एखादी गोष्ट सांगतांना तीत बरीच अतिशयोक्ति आणितात), (५) दुसऱ्याच्या मतांचा डोळे मिटून स्वीकार करणे. वगैरे.
 निर्णय बरोबर आणि व्यवस्थेशीर न होण्याची कारणे:-
 (१) निर्णय करण्याच्या पद्धतीतील दोष, (२) अव्यवस्थिशीर निरीक्षण, (३) गैरसमज, (४) एखाद्या भावनेचा जोर व त्यामुळे मनाची एकाग्रता व समतोलपणा ढळणे, (५) स्वभावः-एखाद्या मुलाची आई अगर दाई जर निर्दय असली तर ते भाईसंबंधी सामान्यनिर्णय बरोबर करणार नाही.
 असंदिग्धता व व्यवस्थेशीरपणा यांशिवाय निर्णयांत थोडीबहुत स्वतंत्रताहि पाहिजेच. येथवर निर्णयाचे सामान्यस्वरूप, त्यास लागणारे अवश्य गुणधर्म, निर्णयशक्तीची वाढ, वगैरेसंबंधी सांगितले. आतां शाळांतून जे विषय शिकवितात त्यांपैकी निर्णयशक्तीचा विकास करण्याच्या कामी कोणते विषय कसकसे उपयोगी पडतात ते पाहू.
 (१) लेखन व चित्रकला:- -या विषयांत नमुन्याप्रमाणे आपले चित्र अगर अक्षर येते किंवा नाही, चूक कोठे होते, केवढी होते, ती कशी दुरुस्त करितां येईल, हे मुलांना पाहावयास लावावें. असे केल्याने त्यांच्या निर्णयशक्तीचा विकास होईल.
 (२) बालोद्यानशिक्षणांत निर्णयशक्तीचा एकसारखा विकास होत असतो. निरनिराळे रंग जवळ ठेवून त्यांची तुलना करणे, कागद कातरून अगर त्याच्या घड्या घालून डबे, होड्या, फुलें, यांसारखे पदार्थ बनविणे, नमुन्याबरहुकूम मातीची अगर शाडूची चित्रे तयार करणे, कागदाच्या अगर गवताच्या पट्ट्या घेऊन त्यांच्या चटया, टोपल्या वगैरे बनविणे, लाकडाचे चौकोनी ठो ८