पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८३)

योग करावा. मुलांकडून पुष्कळ वस्तूंचे निरीक्षण करवावे व त्या वस्तूंचे वर्गीकरण करण्यास शिकवावें.
 (२) सामान्यभाव स्पष्ट करण्याकरितां योग्य उदाहरणे घ्यावी.
 (३) व्याख्या आरंभी सांगू नये.
 (४) शब्दांचा अर्थ मुलांना बरोबर समजला किंवा नाही याबद्दल वरचेवर प्रश्न करून पहावे.
 (५) अगोदर वस्तु व नंतर शब्द हे तत्त्व ध्यानात ठेवावे.
 बालोद्यान, वस्तुपाठ, व्याकरण, निबंधलेखन, भूमिति, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र, अंकगणित बीजगणित वगैरे विषयांत विचारशक्तीस बरेंच शिक्षण मिळतें, व सामान्यबोध हा विचाराचाच एक भाग होय.

भाग अकरावा.
निर्णयशक्ति.

 निर्णय म्हणून जो मनोव्यापार आहे त्याचा समावेश विचार या उच्च मनोव्यापारांतच होतो. दोन सामान्य कल्पनांमधील संबंध जेव्हां मनास समजतो तेव्हां निर्णय हा व्यापार होतो असें समजावें. या मनोव्यापारास लागणारे साहित्य बोधशक्ति व सामान्यवोधशक्ति पुरवितात. अर्थात् या साहित्याचे बरेवाईटपणावर या व्यापाराचा बरेवाईटपणा अवलंबून असणार. वाक्य अगर सिद्धांत हे निर्णयाचे बाह्य स्वरूप होय.'कुत्रा हे एक जनावर आहे ' असें जेव्हां आपण म्हणतो तेव्हां आपल्या मनास काय बोध होत असतो हे आपण पाहूं. प्रथम 'कुत्रा' व 'जनावर' या शब्दांनी दर्शित ज्या कल्पना त्यांची मनास चांगली ओळख पाहिजे. हीच जर नीटशी नसेल तर पुढील सर्व व्यापार चुकीचे होणार. असो; आपण असे समजून चालं की, या शब्दांचा बरोबर बोध झाला आहे. प्रथम मनासमोर ' जनावर ' व 'कुत्रा'