पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८१)

शिक्षकाने शब्दांचा अर्थ स्पष्ट करून सांगावा असे जरी येथे सांगितले आहे, तरी ' अगोदर वस्तु व नंतर शब्द अगर तद्दर्शक नामें' हा शिक्षणशास्त्रांतील महत्त्वाचा नियम विसरता कामा नये. मुलांना नेहमी आपल्या कल्पना शब्दांनी सांगावयास लावावें. शब्द आपल्या मनांतील कल्पनांचे बाह्य स्वरूप होत. ते ज्या त-हेचे असतील त्या तन्हेच्याच कल्पना असणार. केव्हां केव्हां मुलांना शब्दांच्या सोप्या व्याख्याहि तयार करावयास लावावें.
 शाळांतून जे निरनिराळे विषय शिकविले जातात त्यांपैकी वस्तुपाठ, बालोद्यान, निबंधलेखन, भूमिति, व्याकरण, रसायनशास्त्र,वनस्पतिशास्त्र, अंकगणित व बीजगणित हे विषय सामान्यबोधशक्तीचा विकास करण्याच्या कामी मुख्यत्वेकरून उपयोगी पडतात.हे विषय शिकवितांना सामान्यबोधशक्तीवर कमजास्त प्रमाणानें ताण पडतो. ज्याविषयांमुळे कमी ताण पडतो ते अगोदर शिकवावे. लहानपणी म्हणजे पहिल्या तीनचार वर्षांत, घर, पक्षी, पिंजरा यांसारख्या अगदी साध्या पदार्थांची मुलांचे मनास ओळख होत असते. बालोद्यानकालांत म्हणजे चार वर्षांपासून सातवें वर्ष संपेपर्यंत संख्या व आकार यांची मुलांस कल्पना होते. यापुढील कालांत म्हणजे सरासरी चवदाव्या वर्षापर्यंतचे कालांत इतर सर्व सामान्य कल्पनांची ओळख होते. ही स्थिति लक्षात घेऊन कोणते विषय केव्हां शिकवावे हे शिक्षकाने ठरविले पाहिजे. वस्तुपाठ शिकवितांना मुलांना निरनिराळ्या वस्तूंमधील साम्य हुडकून काढावयास व पदार्थ वेगळे काढून त्यांचे वर्गीकरण करावयास लावावें, रसायनशास्त्र व वनस्पतिशास्त्र ही सामान्यबोधशक्तीचा विकास करण्याचे कामी विशेष उपयोगी पडतात. निरनिराळ्या पदार्थांचे व वृक्षांचे मुलांनाच वर्ग करूं द्यावे; आपण सांगत बसू नये.व्याकरण आणि भूमिति शिकवितांना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावयाच्या तें वर सांगितले आहेच.

गोषवारा.

 (१) विचारशक्तीचा विकास करितांना निरीक्षणशक्तीचा उप-