पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७१)

सातव्या वर्षांपर्यंत ही शक्ति विशेष प्रबल असते; ज्ञान वाढत जाते तसतसें हिचे स्वरूप बदलते.
 या शक्तीवर दाब पाहिजे, शिक्षकांनी दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे:-(१)कल्पनाशक्तीस लागणारी सामुग्री पुरेशी पाहिजे. (२) भावना व कल्पनाशक्ति यांमध्ये निकट संबंध आहे.
 अध्यापनाचे कामी कल्पनाशक्तीचा उपयोग व शिक्षकांचे कर्तव्यः- इतिहास, भूगोल, वाङ्मय वगैरे विषय शिकवितांना कल्पनाशक्तीचा विकास करितां येतो; सबब या शक्तीचे स्वरूप लक्षात आणून हे विषय शिकवावे.
 (२) मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
 (३) भाषा परिचित, साधी, सुबोध व जोरदार असावी.
 (४)मुलांना कोणत्या गोष्टी माहीत आहेत ते अगोदर पाहावें व त्यावरून शिक्षणाची दिशा ठरवावी.
 (५) आरंभी इतिहास ठळक ठळक गोष्टींच्या रूपाने शिकवावा.
 (६) शक्य तेथें चित्रे, तसबिरा वगैरे वस्तूंचा उपयोग करावा.

भाग नववा.
सामान्य- -बोधशक्ति.

 जेव्हा एखाद्या पदार्थाचा व आपल्या इंद्रियाचा (म्हणजे कोणत्याहि ज्ञानेंद्रियाचा ) संनिकर्ष होतो, तेव्हां बोध म्हणून जो मानसिक व्यापार पूर्वी सांगितला आहे तद्वारे त्या पदार्थाचे आपणांस ज्ञान होते. आतां हाच पदार्थ जर आपल्या इंद्रियपथाचे बाहेर नेला तर मात्र फक्त पूर्वी मनावर उमटलेल्या प्रतिमेच्या द्वारे त्या पदार्थाचें ज्ञान होते. हा स्मृतीचा व्यापार झाला. कल्पनाशक्तीच्या साहाय्याने आपणांस अपरिचित वस्तूंविषयींचें ज्ञान होतें. बोध व कल्पना या शक्तीमुळे आपणांस एक विशेष प्रकारचे ज्ञान होत असते.तें कांही विवक्षित वस्तूंसंबंधी होत असते. परंतु या ज्ञानाहून भिन्न