पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होतें तें प्रथम अंधुक असते व नंतर हळू हळू त्यास स्पष्ट व निश्चित स्वरूप प्राप्त होते. याच तत्त्वाचा इतिहास हा विषय शिकवितांना उपयोग करावा. कोणत्याहि ऐतिहासिक गोष्टीचे विवेचन करितांना प्रथम तिच्या सामान्य स्वरूपाविषयी सांगावें व नंतर त्यांतील बारीक मुद्यांकडे वळावें. जो भाग सोपा व सरळ असेल तो प्रथम हाती घ्यावा. इतिहास हा विषय शिकविणे सोपे नाही. एकतर शिक्षकास खतांला पुष्कळ माहिती पाहिजे; व जरी एखाद्यास माहिती असली तरी कल्पनाशक्तीचें साहाय्य कसे मिळवावें हे माहीत नसते. आतांपर्यंत वर ज्या ज्या मानसिक शक्तींचे वर्णन केले त्या सर्वांत कल्पनाशक्तीस योग्य वळण देणे व शिक्षणाच्या कामी तिचा उपयोग करून घेणे हे काम थोडे अवघड आहे. असो; प्रथमारंभी इतिहास ठळक ठळक ऐतिहासिक गोष्टींच्या रूपाने शिकवावा. कार्यकारणभावसंबंधाकडे लहानपणीं मुलांचे लक्ष जात नसते, परंतु त्यांना गोष्टी ऐकण्याची मात्र हौस असते. ही हौस पुरवावी व इतिहासासंबंधी अभिरुचि उत्पन्न करावी. कल्पनाशक्तीस योग्य वळण लावतांना जेथे जेथें म्हणून शक्य असेल तेथें तेथेंचित्रे, तसचिरा वगैरे साधनांचा उपयोग करावा. कोणत्याहि मानसिक शक्तीस शिक्षण द्यावयाचे असो, ते देतांना इंद्रियद्वारे प्रत्यक्ष जी जी माहिती मिळविणे शक्य असेल ती ती मिळवून दिली पाहिजे.

गोषवारा.

 कल्पनाशक्तिः–ही शक्ति आपल्या मनांत ज्या काही कल्पना असतील त्यांपासून काहीतरी नवीन प्रतिमा बनविते.-उ. डोंगरावरून पर्वताची कल्पना; तळ्यावरून सरोवराची.
 ज्या गोष्टी प्रत्यक्ष पाहणे अशक्य असते त्यांची कल्पना या शक्तीमुळे होते.
 कल्पनाशक्तीचे प्रकारः-बौद्धिक कल्पनाशक्ति व भावनाउत्पाएक कल्पनाशक्ति; मुलांची कल्पनाशक्ति दुसऱ्या प्रकारची असते.
 कल्पनाशक्तीची वाढ व जोपासना:-तिसऱ्या वर्षापासून