पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६८)

होते. असा अनुभव आलेला आहे की, ज्या मुलांची कल्पनाशक्ति विशेष प्रबल असते ती कोणतीहि गोष्ट लवकर ग्रहण करितात व त्यांना शिक्षण देणे अधिक सोपे जाते. पुष्कळ वेळां असे आढळून येते की, काही मुलांचे ठिकाणी कल्पनाशक्तीचा जवळ जवळ अभावच असतो. अशा स्थितीत शिक्षकाने मुलांची जिज्ञासा जेणेकरून जागृत होईल असेच उपाय योजावे.
 कल्पनाशक्तीवर योग्य दाब ठेवणे म्हणजेच तिची जोपासना करणे होय. कल्पनाशक्तीस बेफाम होऊ देता कामा नये. मिस एजवर्थनें असें म्हटले आहे की, कल्पनाशक्ती अग्नीप्रमाणे उत्तम सेवक व वाईट धनीण होय. याचा अर्थ इतकाच की, जेथपर्यंत कल्पनाशक्तीवर आपला दाब असेल, तेथपर्यंतच तिच्यापासून आपला कांहीतरी फायदा ( अर्थात् ज्ञानप्राप्तीचे कामों ) होण्याचा संभव; उलट आपल्यावर जर का कल्पनाशक्तीचा अंमल झाला, तर काहीएक फायदा न होतां उलट आपल्या कामांत मात्र विघ्न येणार. लहान मुलांच्या अडदांड कल्पनाशक्तीवर शिक्षकाने दाब ठेविला पाहिजे. मुलांना लहानपणी राक्षस, भुते वगैरेच्या गोष्टी सांगू नयेत. नैतिकदृष्टया हे घातक असते, इतकेच नव्हे तर यामुळे मुलांच्या शरिरांवर वाईट परिणाम होण्याचा बराच संभव असतो. मुलांच्या कल्पनाशक्तीस फारशी प्राप्त होऊ देऊ नये. तथापि तिची योग्य जोपासना केलीच पाहिजे. कल्पनाशक्तीस योग्य वळण लावतांना आपण मुख्यतः दोन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. (१) कल्पनाशक्तीचे व्यापारास लागणारी सामुग्री पुरे इतकी आहे की नाही हे प्रथम पाहिले पाहिजे. मुलांना निरनिराळ्या वस्तु दाखवाव्या, त्यांची निरीक्षणशक्ति वाढवावी व त्यांनी जे काही पाहिले असेल, त्याचे बरोबर ग्रहण झाले आहे अगर नाही याची कसोटी पाहण्याकरितां पाहिलेल्या वस्तूंचे वर्णन करण्यास मुलांना लावावें.
 (२) दुसरी गोष्ट ही की, कल्पनाशक्ति व सुखदुःखादि भावना यामध्ये अगदी निकट संबंध आहे. म्हणून लहान मुलांना .