पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६७)

स्वतांला निरनिराळ्या प्राण्यांची सोंगे देतात व तदनुरूपः आपलें वर्तन करितात, यांसारखे प्रकार आपण पुष्कळदां पाहिले असतीलच. समान वयाच्या मुलांच्या कल्पनाशक्तीपेक्षा मुलींची कल्पनाशक्ति विशेष प्रबल असते, असें नीट निरीक्षण केल्यास आढळून येईल. मुलींच्या शरिराची व मनाची वाढ होण्यास कमी फाल लागतो; यामुळेच त्यांच्या कल्पनाशक्तीचीहि वाढ अगोदर होत असावी. लहान मुलांस शक्य काय, अशक्य काय, याचें मुळीच ज्ञान नसते, व म्हणूनच त्यांचे वर लिहिल्या त-हेचे वर्तन दृष्टीस पडते.

कल्पनाशक्तीची वाढ व जोपासना.

 तिसरे वर्षापासून सातवें वर्ष संपेपर्यंत मुलांची कल्पनाशक्ति विशेष प्रबल असते. या कालांत मुले आपल्या कल्पनाशक्तीने जणूं काय नवीनच काल्पनिक सृष्टि निर्माण करून त्यांत यथेच्छ क्रीडा करितात. या कालांत कल्पनाशक्ति थोडीशी अडदांड असते असे म्हणण्यास हरकत नाही. आठवे वर्षाचे सुमारास विचारशक्तीचा उदय होतो व तिचा कल्पनाशक्तीवर अंमल सुरू होतो; चिमणीकावळ्यांच्या कल्पित गोष्टींचा मुलांना तिटकारा येऊ लागतो, व ऐतिहासिक गोष्टी ऐकण्याची इच्छा त्यांचे ठायी दिसू लागते. मुलांस जसजसें ज्ञान मिळत जाते तसतसे त्यांच्या कल्पनाशक्तीचे स्वरूप बदलत जाते. कल्पनाशक्ति प्रवर्तकशक्तांचे ( इच्छाशक्तीचे ) तंत्राने हळू हळू वागू लागते; व तिचा ज्ञानप्राप्ति करून देण्याचे कामी चांगला उपयोग होतो.
 कल्पनाशक्तीस योग्य वळण लावणे हे आईबापांचे व शिक्षकांचें काम होय. कित्येकांची अशी समजूत असते की, कल्पनाशक्तीपासून काहीएक फायदा न होता उलट आपल्या कामांत मात्र अडथळा होतो, सबब जितक्या लवकर ती समूळ नाहीशी करितां येईल तितकें बरें. परंतु ही समजूत अगदी चुकीची आहे असे वर लिहिलेल्या वर्णनावरून दिसून येईल.
 आपणांस जे काही ज्ञान होते त्यापैकी बरेचसें कल्पनाशक्तीमुळेच