पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६५)

कल्पनाशकीचे साधे स्वरूप. असली कल्पनाशक्ति सर्वांचे ठायीं असते. आपल्या अंगच्या बुद्धिकौशल्याने काहीतरी अजब चीज निर्माण करणे, हे तिचें गहन स्वरूप. असली कल्पनाशक्ति क्वचितच आढळते. कालिदास, शेक्सपीअर यांसारख्या कवींच्या अंगी मात्र ती दिसते. कल्पनाशक्तीचा दोन कामी उपयोग होतो. एक ज्ञानप्राप्ति करून देण्याच्या कामी व दुसरा मनांत आल्हाद वगैरे भावना उत्पन्न करण्याच्या कामी. या दृष्टीने विचार केला म्हणजे कल्पनाशक्तीचे दोन वर्ग करितां येतील. (१) बौद्धिक कल्पनाशक्ति (२) भावनाउत्पादक कल्पनाशक्ति.
 सर्व शिक्षणांत कल्पनाशक्तीची एकसारखी गरज लागते. कोणतीहि गोष्ट नीट ध्यानांत येण्याकरितां तिचे कल्पनाशक्तीकडून बरोबर ग्रहण झाले पाहिजे तरच उपयोग. आपण कांही वाचतों व ऐकतो त्याचा बरोबर बोध आपणांस कल्पनाशक्तीचेच द्वारे होतो.विद्युत् म्हणजे काय याचीच ज्याला कल्पना नसेल त्यास विजेचे योगाने एका ठिकाणची बातमी दुसऱ्या ठिकाणी कशी नेता आणिता येते, हे मुळीच समजणार नाही. तसेंच बांयगोळा, सुरुंग, वादळ, बर्फाचे पर्वत यांची ज्या मुलास कल्पनाच नसेल त्यास यांपासून काय काय बरेवाईट परिणाम होतात, हे समजणारच नाही. यावरून कल्पनाशक्तीचे किती महत्त्व आहे हे समजेल. एखादे गोष्टीचें वर्णन बरोबर समजण्याचेच कामी कल्पनाशक्तीची गरज लागते असें नाही, तर कोणताहि नवीन शोध लावण्याचे कामींहि व सृष्टिनियम ठरविण्याचे कामीसुद्धा कल्पनाशक्तीचें प्रथम साहाय्य लागते.ज्या लोकांनी मोठमोठे शास्त्रीय शोध लाविले त्यांना प्रथम ' अशी स्थिति असल्यास असे होईल ' यासारखी काल्पनिक अनुमानें बांधावी लागतात. असो. कल्पनाशक्तीमुळे आपणांस बाह्यजगाविषयींचेंच ज्ञान होते असे नाही तर अंतस्थजगाचीहि माहिती होते, व नीतिशिक्षणाच्या कामी याच माहितीचा फार उपयोग होतो. संकटात सापडलेल्या माणसाची काय स्थिति होते, त्याचे मनात