पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६२)

सहाव्या वर्षापासून बाराव्या वर्षापर्यंत स्मरणशक्ति विशेष प्रबल असते.
 स्मरणशक्तीचे शिक्षण व शिक्षकांचे कर्तव्यः-शिक्षणाचे दोन भाग (१ ) ग्रहण (२) स्मरण.
 (१) ग्रहण:-(अ) काही विवक्षित वेळीच ग्रहण बरोबर होते. ( व ) विषय सुलभ करावा.( क ) मांडणी आकर्षक असावी.(ड) पुनरावृत्ति पाहिजेच. (इ) साहचर्याच्या तत्त्वाचा योग्य उपयोग करावा.
 (२) स्मरण:-(अ) प्रश्न विचारून जें शिकविलें असेल त्याचे पुनरुच्चारण करून घ्यावे. (ब) निरीक्षण वाढवावें. (क) उत्तम स्मरणशक्तीचे गुणधर्म कोणते ते नजरेपुढे ठेवावे. (ड) शिकविलेल्या गोष्टींचे मनन करावयास लावावें. ( इ ) साहचर्य तत्त्वाचा योग्य उपयोग करावा-वस्तुपाठ, उजळणी, वाचन यांत सांनिध्यसाहचर्याचा उपयोग होतो; बालोद्यान, व्याकरण, शास्त्रीयविषय यांत सादृश्यसाहचर्याचा उपयोग होतो.
 कोणत्या गोष्टी मुलांकडून पाठ करवाव्या ?
 : उत्तरः-ज्या गोष्टींचा एकसारखा उपयोग होतो त्या-उ. पाडे, पावकी, निमकी वगैरे गणितातील भाग; भूमितीतील व्याख्या; कांहीं कांही म्हणी व वेचे; इतिहासांतील महत्त्वाचे सन इत्यादि.

भाग आठवा.
कल्पनाशक्ति.

 पूर्वी सांगितलेच आहे की, मनोव्यापारांस लागणारी सामुग्री पुरविण्याचे काम ज्ञानेंद्रिय करितात. ही सामुग्री मनांत आली म्हणजे तीपासून निरनिराळ्या नवीन जिनसा अवधानाचे देखरेखीखाली बनविल्या जातात. ज्ञानेंद्रिये ज्या प्रकारचा कच्चा माल देतील त्यावर त्या मालापासून तयार होणाऱ्या जिनसांचा बरेवाईटपणा अवलंबून राहील. आपणांस उत्तम प्रकारचा कपडा तयार करावयाचा