पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

द्यावा. नेत्रद्वारें मनावर शक्य तेवढ्या गोष्टींचा ठसा उमटेल असें करावें. नद्यांची लांबीरुंदी, एखाद्या देशांतील भूशिरें, आखातें, सामुद्रधुन्या,यांची लांबलचक यादचीयाद; तसेच सर्व गांवांची लोकसंख्या, अशासारखे भाग मुलांकडून कधीच घोकवू नयेत. ज्या गोष्टी थोडासा विचार केला असतां आठवण्यासारख्या असतील त्या कधीच पाठ करवू नयेत हे तत्त्व शिक्षकांनी नेहमीं ध्यानांत बाळगावे, म्हणजे शिक्षणाच्या कामी स्मरणशक्तीचा योग्य उपयोग त्यांस करितां येईल.

गोषवारा.

 आधी बोध, नंतर धारणा, नंतर स्मरण असा क्रम असतो.
स्मरणशक्तीचे प्रकार- -ऐच्छिक, अनैच्छिक, सामान्य व विशेष.
 स्मृति दोन गोष्टींवर अवलंबून असतेः-(१) इंद्रियद्वारें मनावर पूर्वी उमटलेला ठसा व (२) साहचर्य.
 (१) मनावर उमटणारा ठसा (अ) संस्काराचा जोर (ब)त्याची पुनरावृत्ति व. ( क ) तत्कालीन मनाचा तरतरीतपणा यांवर अवलंबून असतो.
 (२) साहचर्य-चारप्रकार- (अ) वस्तुसाहचर्य-उ.साखर व गोडी.
 (ब) स्थलसाहचर्य-उ. शाळा व अभ्यास. (क) कार्यकारणसाहचर्य-उ. ढग व पाऊस (ड) शाद्विक साहचर्य-उ. शब्द व कल्पना.
 या सर्वांचा समावेश सांनिध्यसाहचर्य या एका शब्दांत होतो.
 स्मरणशक्तीचा बरेवाईटपणा तीन गोष्टींवरून समजतो.
 (१) पूर्व संस्कार व त्याची स्मृति यांमधील काल ( २) पूर्व संस्काराच्या प्रतिमेचा स्पष्टपणा व पूर्णपणा व ( ३ ) त्याची आठवण करून देण्यास लागणारी प्रवर्तकशक्तीची [ इच्छाशक्तीची ] मदत.
 स्मरणशक्तीची वाढ:- ही शक्ति चवथ्या अगर पांचव्या महिन्यांत दिसू लागते. दुसऱ्या वर्षी शब्दांचे अर्थ समजू लागतात; ६