पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५८)

पासून धडा म्हणू लागतात. कारण धड्याचे निरनिराळे भाग त्यांच्या मनांत सांनिध्यसाहचर्याने एकत्र राहिलेले असतात.
 (४) मुलांना जेव्हा आपण वाचावयास शिकवितो त्यावेळी नेत्र, श्रवण व जिव्हा, यांचे द्वारें मनावर उमटणाऱ्या ठशांची व त्यांनी दर्शविलेल्या वस्तूंची अगर कृतींची आपण जणूं काय सांगड घालितों. ही सांगड जितकी दृढ करितां येईल तितकी करावी. असे केल्याने मुलांस चांगले वाचता येते. असो; आता आपण सादृश्यसाहचर्याचा शाळेंत केव्हा व कसा उपयोग होतो त्याकडे वळू.
 (१) बालोद्यान शिक्षणांत या प्रकारच्या साह्चर्याचा एकसारखा उपयोग होत असतोः-एक रंग व दुसरा रंग जवळ जवळ ठेवून त्यांची तुलना करणे. बालोद्यान शिक्षणास जे इतके महत्त्व प्राप्त झाले आहे ते यामुळेच.
 (२) काही विशेष गोष्टींचे निरीक्षण करून अगर मुलांकडून करवून जेव्हा एखादा सामान्य नियम आपण त्यांपासून काढितों, तेव्हां आपण याच साहचर्याचा उपयोग करितो. विशेषेकरून व्याकरण व शास्त्रीयविषय शिकवितांना असे करण्याचा आपणांस पुष्कळदा प्रसंग येतो. कर्तरि-प्रयोग कर्मणि-प्रयोग अगर यांसारखे दुसरे व्याकरणाचे भाग शिकवितांना प्रथम फळ्यावर दहापांच उदाहरणे शिक्षकाने लिहावी व त्यांतील सादृश्य दाखवून व योग्य प्रश्न करून,काय तो सामान्य नियम ठरवावा.
 स्मरणशक्तीस शिक्षण देतांना मुख्य जी गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की, तिचे साहाय्याने शक्य तितकें ज्ञानार्जन करिता आले पाहिजे व स्मरणशक्ति तीव्र बनून योग्य दिशेने तिचा विकास झाला पाहिजे. यांपैकी पहिली गोष्ट साध्य होण्याकरिता शिक्षकानें कोणती गोष्ट महत्त्वाची आहे, कोणती नाही, हे मुलांस सांगितले पाहिजे. कोणताहि धडा शिकवितांना त्यांतील मुख्य मुख्य मुद्यांचा भाग मुलांच्या समोर पद्धतशीर मांडावा. स्मरणशक्तीवर होता होईल तो कमी ताण बसेल असें करावें. मुलांस