पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५३)

सुलांच्या ठायीं स्मरणशक्तीचा बीजांकुर तिसऱ्या महिन्यांतच दिसू लागतो.
 इंद्रियद्वारे होणाऱ्या संस्काराचो बरेच वेळां पुनरावृत्ति झाली की, या संस्काराची प्रतिमा मनावर खोल व स्पष्ट उमटते. मूल साधारण वर्ष दीड वर्षाचे झाले की, त्यास शब्दांचे अर्थ समजू लागतात. मुलांस यावेळी शब्दांचे उच्चार करितां येत नाहीत हे खरे;पण शब्द व त्यांचे अर्थ यांमध्ये साहचर्य होऊ लागते. तसेच नेहमी वरचेवर पाहण्यात येणारे पदार्थ व त्यांचे गुणधर्म यांमध्ये साहचर्य होऊ लागते; व म्हणूनच दिवा पाहिला की 'हाय काहीतरी लखलखीत रंगीबेरंगी पदार्थ पाहिला की 'बाळ; मांजर पाहिले की 'माऊ; ' एखादा किडा पाहिला की 'बाऊ;' तसेंच एखादें जनावर पाहिले की 'हम्मा'; अशा त-हेचे शब्द मुले उच्चारतात व हे शब्द उच्चारतांना त्यांच्या स्वरूपांत काहीएक प्रकारचे फेरबदल दृष्टोत्पत्तीस येतात व या योगाने उच्चारिलेल्या शब्दांचे अर्थ मुलांना समजले अशी पाहणाराची खात्री होते. ही स्थिति साधारणपणे दुसरें वर्ष संपता संपता होते. सांनिध्यसाहचर्य प्रथम दृष्टोत्पत्तीस येते व त्याचे मागून काही काळाने मुलांस सादृश्य-साहचर्याची ओळख होते.(सांनिध्यसाहचर्य व सादृश्यसाहचर्य म्हणजे काय तें पूर्वी सांगितले आहेच.) अगदी लहान वयांत म्हणजे पहिल्या आठदहा महिन्यांत मुलांच्या नजरेसमोरकित्येक वस्तु येतात. ज्ञानेंद्रियद्वारे त्यांच्या मनावर बाह्य वस्तूंमुळे एकसारखे आघात होत असतात. तथापि धारणाशक्तीच्या अभावामुळे मनावर कांहींच ठसा उमटत नाही. तिसऱ्या वर्षांचे सुमारास धारणाशक्ति बरीच प्रबळ होते व म्हणूनच याच कालापासून स्मरणशक्तिहि दिसू लागते. सहावे वर्षापासून बारावेतेरावे वर्षापर्यंत स्मरणशाक्त झपाट्याने वाढत असते. या कालांत नवीन नवीन संस्कार मनावर त्वरित होतात; व त्यांचा ठसाहि मनावर पक्का उमटतो. एखादी गोष्ट दोनतीनदा सांगितली की, ती मुलाच्या ध्यानात राहते. अमरकोशांतील श्लोकासारखे श्लोक, ज्यांचा