पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५२)

होणाऱ्या ज्ञानाची स्मृति राहते. स्पर्शेद्रियद्वारे होणाऱ्या ज्ञानाचा नंबर याचे खालींच. जिव्हा व प्राणेंद्रिय यांचे साधनाने होणा-या ज्ञानाची स्मृति अगदीच अपुरी व अंधक असते.
 मेंदूचा लवचिकपणा व स्मरणशक्तीची वाढ यांचा काहीतरी विशेष संबंध असावा असे दिसते. हा लवचिकपणा लहानपणीं वाढत जातो व याची वाढ बाराव्या अगर तेराव्या वर्षाचे सुमारास बंद होते. कोणताहि मानसिक व्यापार घ्या, त्यामुळे ज्ञानतंतूंच्या स्थितीत काहीएक प्रकारचा फेरबदल होतो. निरनिराळे सूक्ष्म ज्ञानतंतु या व्यापारांमुळे जणू काय जोडले जातात; व हे एकदा पके जोडले गेले म्हणजे त्यांच्या अंगचा लवचिकपणा कमी होतो. असो. आतां आपण स्मरणशक्तीची वाढ कसकशी होत जाते तें पाहूं; व नंतर वर स्मरणशक्तीच्या स्वरूपाचे जे वर्णन दिले आहे त्याचा शिक्षणाच्या कामी कसा उपयोग करून घेता येईल त्याकडे वळू.

स्मरणशक्तीची वाढ.

 अगदी तान्ह्या मुलास स्मरणशक्ति नसतेच असें म्हणण्यास हरकत नाही. तथापि एखादा पदार्थ पाहिल्यानंतर फिरून काही काळाने जर तो नजरेसमोर आला तर मात्र मूल तो पदार्थ ओळखते. मूल सरासरी चारपांच महिन्यांचे झाले की, त्याच्या ठिकाणी स्मरणशक्ति येऊ लागते. आईनें वाटीत दूध घातले की, आपणास आई दूध पाजणार असें मुलास वाटतेसे त्याच्या चेहऱ्यावरून दिसते. काजळाची डबी आईने उघडली की आपणास आई काजळ घालणार हे ज्ञान मुलास होते. कारण मूल लगेच रडू लागते व जवळ दुसरे कोणीतरी ओळखोचे माणूस दिसल्यास त्याचेकडे धाव घेते. तसेंच आई तेलाहळदीच्या वाट्या घेऊ लागली, अगर पाळण्यांत अंथरूणपांघरूण करूं लागली की पुढे काय होणार हे मूल पूर्वानुभवाच्या स्मृतीवरून ताडते. इंद्रियद्वारे होणारे ज्ञान लहानपणी अगदीच अपुरे व अर्धवट असते, व म्हणूनच स्मरणशक्तीचा जवळ जवळ अभावच असतो. पूर्वी सांगितलेच आहे की, स्मरणशक्तीच्या व्यापारास लागणारे सर्व साहित्य इंद्रियेच पुरवितात. काही काही