पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५०)

तलेली असेल, त्यांची आठवण होणार. केव्हां केव्हां या प्रेरणेच्या साहाय्याने आपणांस इष्ट गोष्टींची अगर कल्पनांची त्वरित आठवण होते. केव्हां केव्हां याच्या उलट प्रकारहि होतो. एखादी कविता म्हणतांना बरेचसे सारखे चरण असले म्हणजे मुले पहिला चरण म्हणाल्यावर दुसरा न म्हणतां तिसरा अगर चवथा चरण म्हणूं लागतात हे आपण पुष्कळ वेळां पाहिले असेलच. असो.
 अलीकडे सप्रयोग मानसशास्त्रांत दिवसेंदिवस बरीच प्रगति होत आहे. लहान मुलांचे मनांवर एकसारखे प्रयोग केले जात आहेत. सर्व मनें सारखींच नसतात हे जरी खरे आहे, तथापि मनामनांत काही सामान्य धर्म म्हणून असतातच. हे धर्म कोणते, काय,ते शोधावे कसे, वगैरे बाबीसंबंधी आजकाल प्रत्यक्ष प्रयोग होत आहेत. स्मरणशक्तीचे गुणावगुण ठरवितांना मुख्यतः तीन गोष्टी विचारांत घेतल्या पाहिजेत, असें ठरले आहे. त्या तीन गोष्टी येणेप्रमाणे:--(१) पूर्वानुभव अगर संस्कार व त्याची स्मृति यांमधील काल, (२) पूर्व संस्काराचे प्रतिमेचा स्पष्टपणा व पूर्णपणा व ( ३) त्याची आठवण करण्यास लागणारी प्रवर्तक-शक्तीची मदत.
 पूर्वानुभव अगर संस्कार व त्याची स्मृति यांमधील काल जितका जास्त तितकी स्मरणशक्ति तीव्र समजावी, तसेंच पूर्वसंस्काराची प्रतिमा जितकी स्पष्ट व परिपूर्ण असेल त्यामानाने स्मृतीचा बरेवाईटपणा समजावा. तसेच एखाद्या संस्काराची आठवण होण्यास प्रवर्तकशक्तीवर जितका कमी ताण पडेल तितकी स्मरणशक्ति चांगली व तीव्र आहे असे समजावे.
 वर स्मरणशक्कोचे ऐच्छिक व अनैच्छिक असे दोन ढोबळ प्रकार सांगितले. आणखीहि काही प्रकार आहेत, त्यांकडे वळू.
 (१) सामान्य स्मरणशक्ति व विशेष स्मरणशक्तिः-
पहिल्या प्रकारच्या स्मरणशक्तीमुळे कोणत्याहि त-हेचे संस्कार मनांत सांठवितां येतात व त्या संस्कारांची आठवण, वाटेल त्यावळी, आपणांस करितां येते. ही स्मरणशक्ति सर्व माणसांच्या ठिकाणी