पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४९)

 सादृश्यसाहचर्याचे नियमः-
 प्रस्तुतकालच्या गोष्टींमुळे (कृति, विचार, कल्पना, भावनाअगर दुसरे अशाच प्रकारचे काही संस्कार यामुळे ) पूर्वी कधीतरी अनुभविलेल्या यांसारख्याच गोष्टींची आपणांस आठवण होते;असें कां होते असे जर कोणी विचारील तर हा मनाचा धर्म आहे येवढेच सांगता येईल.
 काही काही गोष्टींची अगर कल्पनांची आठवण प्रस्तुत गोष्टी अगर कल्पना यांमध्ये व त्यांनी सुचविल्या जाणाऱ्या गोष्टी अगर कल्पना यांमध्ये जो भेदभाव असतो त्यामुळेच होते. उदाहरण- थंड ही कल्पना मनासमोर येतांच तिचे बरोबर उष्ण ही कल्पनाहि मनासमोर येतेच. दुर्गुण--सद्गुण; उच्च--नीच; स्वच्छ--मलीन; उजेड--अंधार; राम-रावण; नेपोलियन-इंग्लिश; ही याच प्रकारची आणखी काही उदाहरणे होत.
 आपले मनांत कल्पनांचे जे साहचर्य होते त्याचा संबंध एका विवक्षित प्रकारच्या शारीरिक व्यापाराशी असावा असा मानसशास्त्रज्ञांचा समज आहे. तो व्यापार कोणता म्हणाल तर पूर्वी कधीतरी जे सूक्ष्म ज्ञानतंतु एकेच कालीं अगर एकामागून एक त्वरित कंपायमान झाले असतील ( अर्थात् इंद्रियद्वारे होणाऱ्या कांहीतरी आघातामुळे ) त्यांचे ठायीं असा काहीतरी धर्म येतो की, फिरून जेव्हा त्यांपैकी एखादा कंपमान होतो त्यावेळी दुसरे त्याचे सहचरहि कंप पावू लागतात. जणू काय त्यांना हेवाच वाढू लागतो. साहचर्याने पुष्कळ गोष्टींची स्मृति जलद होते व पक्की राहाते असे जरी वर सांगितले आहे तथापि हे साहचर्य वरचेवर झाले पाहिजे; नुसते एकदोन वेळां साहचर्य झाल्याने भागणार नाही. एका गोष्टीची अगर कल्पनेची जितक्या जास्त गोष्टींशी अगर कल्पनांशी सांगड असेल तितके चांगले; कारण पुढे त्यांपैकी एकीची आठवण झाली की तिच्याबरोबर दुसऱ्या पुष्कळांची होणार. साहचर्य ही एक प्रकारची सूचक प्रेरणाच होय. ही प्रेरणा जितकी बलवत्तर असेल त्या मानाने ज्या गोष्टींची अगर कल्पनांची साहचर्याने सांगड घा ५