पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४५)

पुष्कळ वेळां आपण म्हणतो की, ही गोष्ट ऐकलीशी वाटते, पाहिलीशी वाटते; याचा अर्थ इतकाच की, या गोष्टीचा ठसा दिसतो न दिसतो अशी स्थिति झालेली असते. एकंदरीत कोणत्याहि वस्तूची अगर गोष्टीची आपणांस स्मृति होण्यापूर्वी दोन व्यापार व्हावे लागतात. पहिला व्यापार इंद्रियद्वारे होणारा बोध व दुसरा धारणा. हे दोन व्यापार बरोबर होण्यास अवधानशक्तीची मदत पाहिजेच; व हे दोन व्यापार जसे व्हावे तसे झाले की तिसरा व्यापार स्मृति सुरळीतपणे होतो. त्यांत मुळीच अडथळा होत नाही. अवधान जसें ऐच्छिक व अनैच्छिक असते त्याचप्रमाणे स्मरणशक्तिहि दोन प्रकारची असते. (१) ऐच्छिक स्मरणशक्ति व (२) अनैच्छिक स्मरणशक्ति. पुष्कळ वेळां आपणांस एखादी गोष्ट आठवत नसते; त्यावेळी आपण आपले सर्व अवधान एकाग्र करितों व काही वेळाने आपणांस ती गोष्ट आठवते.अशावेळी स्मृति होण्याकरितां आपणांस प्रयत्न करावा लागतो म्हणजे प्रवर्तक शक्तीचे ( इच्छाशक्तीचे ) साहाय्य घ्यावे लागते. सबब अशा स्मृतीस ऐच्छिक स्मरणशक्ति हे नांव आपण देऊ. उलट कांहीकाही गोष्टी आपणांस सहज काहीएक यत्न न करितां आठवतात. हा व्यापार ज्या शक्तीमुळे होतो तीस आपण अनैच्छिक स्मरणशक्ति हे नांव देऊ.
 आपल्या अनुभवास पुष्कळ वेळां असें आलें असेल की, काही काही गोष्टींची अगर वस्तूंची आठवण त्या फक्त एकदांच ऐकिल्याने अगर पाहिल्याने राहाते. काही गोष्टी आठवण्यास त्यांची एक सारखी पुनरावृत्ति व्हावी लागते. पुनरावृत्तीच्या मदतीने काही दुर्बोध शब्द अगदी सहज आठवतात. आयोडाईड सार्सापरिला, स्काटस् एमल्शन्, वुइल्यम्स् पिंक पिल्स या सारखे कितीतरी कठीण व दुर्योध शब्द डोळ्याखालून वरचेवर गेल्यामुळे सहज आठवतात !एखाद्या वस्तूचा अगर गोष्टीचा ठसा प्रथम ज्यावेळी आपल्या मनावर उमटतो, त्यावेळी आपल्या मनाची स्थिति जी असेल, तीवरहि स्मरणशक्तीचा व्यापार अवलंबून असतो. काहीकाही गोष्टी