पान:शिक्षण व मानवशास्त्र.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४३)

 (२) मुलांकडून वस्तूंचे नीट निरीक्षण करवावें.
 (३) इंद्रियविकासक्रमहि लक्षात घ्यावा; व तदनुरूप शिक्षणाची दिशा ठरवावी.
 (४) मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करावें.
 (५) बालोद्यान, वस्तुपाठ, वाचन, गायन, लेखन, चित्रकला या विषयांत इंद्रियशिक्षण मिळतें.

भाग सातवा.
-::-
स्मरणशक्ति.

 आपण नेहमी जे काही पाहातों व ऐकतो त्याचा ठसा आपल्या मनावर उमटतो, हा मनाचा धर्मच आहे. यासच धारणा म्हणतात.प्रथम इंद्रियद्वारे पदार्थांचे आपणांस ज्ञान होते. हे ज्ञान धारणाशक्तीमुळे मनांत साठून राहातें, व हे सांठलेले ज्ञान जरूर पडेल त्यावेळी उपयोग करण्याकरितां मन बाहेर काढिते. ही जी क्रिया मन करितें ती स्मरण म्हणून मनाचे ठायीं जी शक्ति आहे तीमुळेच करिते.
 आपणांस एखादी गोष्ट आठवते असे आपण पुष्कळ वेळां म्हणतो; याचा अर्थ काय ते आपण पाहूं. याचा अर्थ इतकाच की, जी गोष्ट आठवते असे आपण म्हणतो, तीमुळे मनावर उमटलेला ठसा, मनासमोर उभा राहातो. यावरून आपल्या असें ध्यानात येईल की, इंद्रियद्वारे मिळणारे ज्ञान ज्या प्रकारचे असेल त्या मानाने मनावर त्याचा ठसा उमटेल. इंद्रियद्वारे जर पके ज्ञान झाले नसेल तर या ज्ञानाचा मनावर उमटणारा ठसा अस्पष्टच असणार. अर्थात् या ठशामधून निघणारे चित्रहि तशाच प्रकारचे असणार. याकरिता एखाद्या पदार्थाची अगर वस्तूची आपणांस चांगली स्मृति व्हावी अशी जर आपली इच्छा